*कवयित्रीचे लेखन आणि ए.आय. तंत्रज्ञानाच्या मदतीने बाल साहित्य विश्वातील नवे प्रयोग म्हणजेच मलेका शेख यांचे "अक्षर अक्षर शिकूया" हे काव्यसंग्रह*
बाल काव्यसंग्रह लिहिणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे कारण मुलांना भावेल, त्यांना सहज म्हणता येईल, गुणगुणता येईल अशा सहज सोप्या शब्दात तसेच मुलांच्या भाव विश्वाला आणि कल्पनेला लक्षात घेऊन एक एक कविता साकारावी लागते. आपले तीन काव्यसंग्रह "मानसमेघ, अमन, आयाम" व एक चारोळीसंग्रह "उमेद" च्या प्रकाशनानंतर कवयित्री मलेका शेख-सय्यद यांनी "अक्षर अक्षर शिकूया" हे बाल काव्यसंग्रह लिहिला आहे. काव्यसंग्रह इतकं सुंदर आहे कि पाहताच वाचण्याचा मोह आवरला नाही.मनातील एक लहान बालक पुन्हा जागा झाला व मी माझ्या लहानपणात रमून गेलो असे वाटले कारण संपूर्ण काव्यसंग्रहात ए.आय. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक कवितेला साजेल असे चित्र प्रकाशकाने साकारले आहे. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ट ज्योती घनश्याम यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून रेखाटले आहे. मुखपृष्टाला शाळेतील वर्गाचे चित्र रेखाटले आहे जो कि काव्यसंग्रहाला शोभून दिसतो. कवयित्री मलेका शेख-सय्यद यांनी आपला काव्यसंग्रह भावंडांना व मुलांना समर्पित केला आहे. या काव्यसंग्रहास लाडोबा प्रकाशनाचे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रस्त...