Skip to main content

Posts

नाट्यवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात साजरा

मातृभाषा अध्यापक संस्था पुणे व रोटरी क्लब पुणे पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या महिन्यात नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या .अनेक शाळांनी यात अगदी उत्स्फूर्त सहभाग दाखवला होता .  या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.ज्ञानप्रबोधिनी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.त्याचे सादरीकरण झाले. लहान गट ,मोठा गट , वाचिक अभिनय , वैयक्तिक ,शिक्षक नाट्य संहिता लेखन , सांघिक असे सन्मान करण्यात आले .  मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे.या संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्मिता ओव्हाळ यांनी प्रास्ताविक केले.संस्थेतील पदाधिकारी मा.संध्या माने,आ.सौ. वंदना आणेकर मा.श्री. निमल गीताभारती,मा.श्रीम. निफाडकर मंगल ,मा.श्री.पढेर विकास मा.सौ.शामला पंडित ( दीक्षित ) ,मा.श्रीम.सुरेखा लेंभे,मा.श्रीम.सोनवणे सुरेखा ,मा.श्री.जगताप सुजित, मा.श्री.गायके संभाजी, मा.श्री.पिंगळे संजय,मा. श्रीम.सुरळकर सुलभा , मा. सौ. शारदा पानगे यांचे कार्यक्रम सुनियोजित पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा . प्रफुल्ल मुक्कामावर यांनी सिंगापूर या देशात ...

*कवयित्रीचे लेखन आणि ए.आय. तंत्रज्ञानाच्या मदतीने बाल साहित्य विश्वातील नवे प्रयोग म्हणजेच मलेका शेख यांचे "अक्षर अक्षर शिकूया" हे काव्यसंग्रह*

बाल काव्यसंग्रह लिहिणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे कारण मुलांना भावेल, त्यांना सहज म्हणता येईल, गुणगुणता येईल अशा सहज सोप्या शब्दात तसेच मुलांच्या भाव विश्वाला आणि कल्पनेला लक्षात घेऊन एक एक कविता साकारावी लागते. आपले तीन काव्यसंग्रह "मानसमेघ, अमन, आयाम" व एक चारोळीसंग्रह "उमेद" च्या प्रकाशनानंतर कवयित्री मलेका शेख-सय्यद यांनी "अक्षर अक्षर शिकूया" हे बाल काव्यसंग्रह लिहिला आहे. काव्यसंग्रह इतकं सुंदर आहे कि पाहताच वाचण्याचा मोह आवरला नाही.मनातील एक लहान बालक पुन्हा जागा झाला व मी माझ्या लहानपणात रमून गेलो असे वाटले कारण संपूर्ण काव्यसंग्रहात ए.आय. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक कवितेला साजेल असे चित्र प्रकाशकाने साकारले आहे. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ट ज्योती घनश्याम यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून रेखाटले आहे. मुखपृष्टाला शाळेतील वर्गाचे चित्र रेखाटले आहे जो कि काव्यसंग्रहाला शोभून दिसतो. कवयित्री मलेका शेख-सय्यद यांनी आपला काव्यसंग्रह भावंडांना व मुलांना समर्पित केला आहे. या काव्यसंग्रहास लाडोबा प्रकाशनाचे प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रस्त...

सांगोला दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांचे उपोषण.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. सांगोला येथील लोकप्रिय दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्झा गालिब मुजावर हे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सांगोला दुय्यम निबंधक कार्यालय अधिकारी यांनी केलेल्या आर्थिक हव्यासापोटी बेकायदेशीर दस्त नोंदणी बाबत कार्यवाही होऊन निलंबन करुन खातेनिहाय चौकशी सुरू करावी.या मागणी साठी मिर्झा गालिब मुजावर उपोषण करीत आहेत.रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता तहसील कार्यालय सांगोला या ठिकाणी उपोषण होत आहे.या उपोषण संदर्भात दैनिक तुफान क्रांती चे मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके यांनी आपली प्रतिक्रिया दिली की,"रास्त न्यायासाठी केलेली मुजावर साहेबांची मागणी योग्य च असून त्यांना आमचा पाठिंबा आहे.पत्रकार हा समाजाचा प्रतिनिधी असतो.त्याला समाजातील चांगल्या वाईटाची जाण असते.न्यायाबाबत मनात सातत्याने जागृकता असते.पैश्याच्या हव्यासापोटी प्रशासना मार्फत चाललेला गैरव्यवहार, कारभार एक जागृक निर्भिड पत्रकार पाहू शकत नाही.त्याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हे उपोषण आहे.समाजातील अशा गैर कारभारावर पत्रकारांनी आपल...

मी प्रतिमा,माझी प्रतिमा हा कवयित्री प्रतिमा काळेचा समीक्षणासाठी सप्रेम भेट दिलेला

मी प्रतिमा, माझी प्रतिमा  हा कवयित्री प्रतिमा काळेचा समीक्षणासाठी सप्रेम भेट दिलेला  कविता संग्रह संपूर्ण वाचला. समीक्षा पब्लिकेशन्स पंढरपूर ने प्रकाशित केलेला व संतोष घोंगडेंनी मुखपृष्ठ चितारलेला हा कविता संग्रह नितांतसुंदर झाला आहे. नवकवयित्रिचा पहिलाच कविता संग्रह आहे.त्या पेशाने शिक्षिका असल्या तरीही त्या उत्तम निवेदिका व संचलनकर्त्याही आहेत. चला धम्म आचरणात आणू  या कवितेत कवयित्री म्हणते, धर्म जातिभेद विसरून, प्रेमाची मशाल घेऊन  भूमीवर समृध्दी आणण्यास  बुध्द नव्याने घेवू समजावून जणू चला धम्म आचरणात आणू.. या कवितेत जातिभेद विसरून,बुध्द नव्याने समजावून घेऊन धम्म आचरणात आणण्याचा मनोदय व्यक्त करते. माझे बाबा,या कवितेत ती वडिलांच्या विषयी आदरभाव व्यक्त करताना म्हणते  बाबा सुगंधी कस्तुरी  खोल मायेचा सागर  विचारांनी आयुष्यात  भरी प्रेमाची घागर!! श्रावण कविता तर श्रावणमासी हर्ष मानसी,ह्या कवितेची आठवण करून देते. प्रेमाला देई उभारी निसर्ग, नागपंचमी सण,श्रावण. माहेरवाशीण माहेराला,  येईल आनंदाला उधान!! प्रितीचा गुलमोहर ...

*पुजा माळी यांचा वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सहभाग*

बारामती येथील जेष्ठ कवयित्री लेखीका पुजा माळी ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक डे केअर सेंटर शाळा व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केलेल्या रुपेरी काव्यहोत्र या सलग २५ तास स्वयंरचीत काव्य वाचनाचा वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहभाग झाल्याबद्दल रुपेरु काव्यहोत्र आयोजक समितिच्या प्रमुख अॅड डॉ सौ अंजली पाटील, सहसचिव श्री गोपाळ पाटील,अॅड श्री ल जि उगावकर, अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला  तसेच डे केअर सेंटर शाळा आयोजित असलेल्या बालकाव्य स्पर्धेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील स्मरनिकेसाठी पुजा माळी यांच्या *बागेत कवितेच्या* या बालकवितेची निवड झाली आहे.

प्रयागराज येथील कुंभमेळा मधील साधुबाबा क्रोधीत होऊन मारहाण करतात.. पत्रकार भारत कवितके यांची खंत.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. प्रयागराज येथील कुंभमेळा मधील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलं साधुबाबा क्रोधित होऊन शिव्या देतात, मारहाण करतात,अशी खंत पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी व्यक्त केली आहे.नागबाबा, अघोरी बाबा, लांब केस वाला बाबा, लांब दाढी वाढलेला बाबा, डमरू वाजविणारा साधु वैगरे वैगरे साधुबाबा पाहयला मिळतात,पण यांना सामान्य माणसाने किंवा पत्रकाराने काही प्रश्न विचारले तर लगेच क्रोधित होऊन शिव्या देतात, मारहाण करतात.खर तर साधुबाबा म्हणजे शांत,सरळ, तपाला, ध्यानस्थ बसलेले साधुबाबा असतात असा समज असतो,पण कुंभमेळा मधील साधुबाबा लवकरच क्रोधित होऊन शिव्या देत मारहाण करताना आपण सर्व जण प्रसार माध्यमांतून पाहतो,हे असे वागणे साधुबाबांना शोभत नाही,हे पाहताना खूपच वाईट वाटते,आपले आपले वेगळेपण दाखविण्यासाठी कुंभमेळा मधील साधुबाबा वेगवेगळ किळसवाणी प्रयोग करताना दिसतात.कुंभ मेळा तील साधुबाबांचे हे वागणे प्रसार माध्यमा व्दारा पाहताना खूप वाईट वाटते, मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.

पुणे:- सौ.प्रतिमा काळे मॅडम यांचा गदिमांचे वारसदार कवी म्हणून सन्मान.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद,आशिया मानवशक्ती विकास संस्था,गणेश इंटरनॅशनल स्कूल,चिखली आयोजित ३२ वा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव मध्ये मंगळवार, दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी मा.आनंद माडगूळकर( गदिमांचे सुपुत्र,संगीतकार),महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,कल्याण आयुक्त मा.रविराज इळवे सर,८९ व्या अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस सर,ज्येष्ठ कविवर्य,मुंबई मा.अशोक नायगावकर सर,नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी चे अध्यक्ष मा. सुदाम भोरे सर,आशिया मानवशक्ती विकास संस्था चे अध्यक्ष मा.श्रमश्री बाजीराव सातपुते सर,कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कविवर्य मा.डॉ.विठ्ठल वाघ सर,गणेश इंटरनॅशनल स्कूल,चिखली चे संस्थापक मा.एस.बी.पाटील सर व या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करणारे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद,पुणे चे अध्यक्ष सर्वांचे लाडके मामा मा.पुरुषोत्तम सदाफुले सर,कार्याध्यक्ष राजेंद्र वाघ सर,उपाध्यक्ष अरुण गराडे सर,मुख्य समन्वयक मा.महेंद्र भारती सर,जयश्री ताई श्रीखंडे,भरत दौंडकर सर,मुरलीधर साठे सर या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्...