*कवी शिवदास वाव्हळ यांच्या 'उध्वस्त भिंती' या काव्यसंग्रहाचे ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकुल मध्ये शानदार प्रकाशन*
ठाणे:- रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड विधानसभा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नीलपुष्प काव्यसंध्या या कार्यक्रमात कवी शिवदास वाव्हळ लिखित हा काव्यसंग्रह राजसा प्रकाशन उल्हासनगर यांनी प्रकाशित केला असून आज या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नीलपुष्प साहित्य समुहाचे आणि सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा. राजेश साबळे, ओतूरकर, प्रमुख पाहुणे कवी मा. डॉ, मारुती नलावडे, आंतरराष्टरीय चित्रकार मा. सुरेश डुंबरे, वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे, गायिका संगीत विशारद मा. सौ सुमुग्धा माळी आणि उपस्थित कवी, लेख साहित्यिक अनेक शैक्षणिक, सामजिक संस्थेतील वाचक रसिक मंडळी तसेच कवी शिवदास वाव्हळ यांचा परिवार आणि पाहुणे, मित्र परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर प्रसंगी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन झाल्यावर कार्यक्रमाच्या पाहुण्या सौ सुमुग्धा माळी यांनी सुंदर ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक सौ. मीनल चौधरी आणि पाहुण्याचा परिचय निवेदिका सौ. निलम शेलटे यांनी करुन देत असताना सर्व मान्यवरांचा यथोचित सन...