Skip to main content

Posts

बोरीवली येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या महाभंडाराचे आयोजन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. बोरीवली पूर्व येथे सद्गुरू संत श्री बाळूमामा यांच्या महाभंडाराचे आयोजन करण्यात आले आहे, शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी जय मल्हार मित्र मंडळ बोरीवली व्दारा शिवाजी नगर रहिवासी संघ, हनुमान टेकडी, काजू पाडा, बोरीवली पूर्व मुंबई ६६ या ठिकाणी सद्गुरू संत श्री बाळूमामा यांच्या महाभंडाराचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ७ वाजता आरती व महाभंडारा, सायंकाळी ७:३० वाजता मान्यवरांचे स्वागत,व रात्री ८ ते १० या वेळेत धनगरी ओव्यांचा रंगतदार, जल्लोषात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या प्रसंगी भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार मित्र नातेवाईक सह उपस्थित राहून सद्गुरू संत श्री बाळूमामा यांचे दर्शन घेऊन महाभंडाराचा लाभ घ्यावा असे जय मल्हार मित्र मंडळा मार्फत कळविले आहे.

अनिका पिकॅडिली मध्ये शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न

पुनावळे बाजार, पुनावळे, पुणे- हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त अनिका पिकॅडिली रहिवासीयांनी सुंदर असा शिव जन्मोत्सव सोहळा आयोजित केला. सायंकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिव पूजन  करण्यात आले.छत्रपतींची आरती करण्यात आली.तदनंतर  शिव जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल अनेकांनी मनोगत व्यक्त केले. "राजं आलं, राजं आलं", अनुज अभिजित ढोली याने यावर नृत्य सादर केले. सौ. माधुरी वैद्य कुमठेकर यांनी ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा कुमठेकर यांनी लिहीलेली छत्रपती शिवराय यांच्यावरील गौरवपर रचना म्हटली. लहान मुलामुलींची  चित्रकला स्पर्धा झाली.  युवा व्याख्याते श्री शुभम मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाने श्रोत्यांना खिळवून ठेवले. ते एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलेपर म्हणून काम करतात. व्याख्यानाच्या मानधनातून ते गड किल्ले यांची स्वच्छता आणि संवर्धन काम करतात. तसेच चिंचवड येथील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पुरविण्याचे कार्य करतात. वयाच्या १६ व्या वर्षापासू...

पंढरपूर येथील होळकर वाड्याचे पावित्र्य राखा... पत्रकार भारत कवितके यांची खंत.

प्रमोद सूर्यवंशी मुंबई. पंढरपूर येथील होळकर वाड्याचे पावित्र्य राखा.. अशी खंत मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी व्यक्त केली आहे.पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पंढरपूर येथील नदी किनारी घाटाच्या शेजारी असलेल्या होळकर वाडा सध्या पंढरपूर नगरपालिका कडून विकासासाठी मध्यंतरी पाडण्यात येणार होता,पण पंढरपूर मधील राजमाता अहिल्याबाई होळकर प्रेमींनी व धनगर समाज बांधवांनी विरोध करुन डाव हाणून पाडला, याबद्दल त्या सगळ्यांचे मनापासून आभार, या वाड्यात राम मंदिर आहे, येणारे जाणारे भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात, परंतु घाटावर वास्तव्य करणारी येथील पुरुष व महिला येथे कपडे वाळत घालतात, मंदिराच्या पायऱ्यांवर अस्ताव्यस्त बसलेले, झोपलेले आढळून येतात, यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होते, दर्शन घेण्यासाठी भाविकांची पंचाईत होते, काही भाविक लांबूनच दर्शन घेऊन जातात, पंढरपूर येथील होळकर वाड्याचे पावित्र्य राखण्यासाठी धनगर समाज बांधवांनी प्रयत्न करावे, असे मुंबई कांदिवली पश्चिम येथील व मूळ गाव पंढरपूर असलेले पत्रकार भारत कवितके यांनी कळविले आहे.

*"कला रंजन न्यूज" वर्धापन दिन सोहळा: समाजसेवेतील नायकांचा गौरव*

समाजसेवेच्या विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान कलारंजन बहुउद्देशीय सामाजिक विचार मंच तर्फे आयोजित महाराष्ट्र दिनाच्या विशेष प्रसंगी, कला रंजन न्यूज च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त "गुण गौरव सोहळा 2025" या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात समाज, कला, साहित्य, क्रीडा, सहकार, शैक्षणिक, उद्योग, कृषी, आरोग्य आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येईल. समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा ठरणार आहे. दरवर्षी प्रमाणपत्रे, ट्रॉफी आणि मानपत्र देऊन सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जाईल. विशेषत: त्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातील जे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात एक चांगला परिणाम साधला आहे आणि समाजासाठी त्यांचे योगदान अप्रतिम ठरले आहे. सर्व इच्छुक व्यक्तींनी आपला प्रस्ताव सादर करावा - इच्छुक व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील योगदान आणि कार्याची माहिती 9226198299 या नंबरवर पाठवावी लागेल. यामुळे, त्यांच्या कार्या...

*।। जय शिवराय ।।*यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्या छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे.

  *।। जय शिवराय ।।* यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्या छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे.... आणि हाच इतिहास प्रत्येकाच्या मनात टिकून राहावा म्हणून, प्रसिद्ध चित्रकार श्रीयुत हरीश पाटील गेले एक वर्ष एका प्रकल्पावर अथक मेहनत करत होते ते म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याचे पेंटिंग! गेले चार महिने सतत दिवस रात्र काम केल्यानंतर, ते पेंटिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. त्यांच्या या मनोभावे केलेल्या कार्याची दखल घेण्यासाठी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब  त्याच बरोबर अनेक मान्यवर सुद्धा तिथे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय जयकुमार रावलजी , आमदार माननीय मनीषाताई चौधरी यांचीही उपस्थिती होती. तसेच हे पेंटिंग त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना भेट म्हणून प्रदान केले.  जय शिवराय...जय शंभु...!! छत्रपती शिवाजी राज्याभिषेक सोहळा (Canvas and acrylic print) पेंटिंग विविध size मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 📞+91 98691 33442 Name: Harish pa...

श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे विकासक आनंद मोदी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी विकासक आनंद मोदी जी यांना श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.विकासक आनंद मोदीजी एक कुशल , रहिवाशांच्या समस्यांची जाण असलेले, घराच्या बदली घर देण्याच्या उद्देशाने एस.आर.ए.योजना श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विभागात राबवित आहेत.रहिवाशांमध्ये मिसळणारे विकासक विभागात लोकप्रिय आहेत.एस.आर.ए.मध्ये येणाऱ्या समस्या विना विलंब सोडविणे, पात्रता, विकास कामांसाठी जागा खाली करणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत.विभागातील लोक प्रिय विकासक आनंद मोदीजी यांना कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,( १७ फेब्रुवारी २०२५) शुभेच्छुक.. अध्यक्ष/ मुख्य प्रवर्तक.. विजय पाल, महासचिव.. भारत कवितके, उपाध्यक्ष..ग्दिविजय पाठक, खजिनदार..दिवानसिंह सौन,उप सचिव.. संजय कुंभार,  उपखजीनदार.. प्रेम शंकर सागर वर्मा..व सभासद, सदस्य, आणि रहिवासी बांधव.

मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्यसमूह महाराष्ट्र या समूहाचे तिसरे साहित्य संमेलन दिनांक ९/०२/२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 हे साहित्य संमेलन प्रसिद्ध कवी/ व्याख्याते/ निवेदन मा. गजानन उफाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपशिक्षणाधिकारी मा.निता श्रीश्रीमाळ, विस्तार अधिकारी मा. विद्या दीक्षित, विशेष अतिथी म्हणून केंद्रप्रमुख मा.अनिल साखरे ,ज्येष्ठ कवी डॉ. शिवा प्रधान व मा .दत्तात्रय भोसले, प्रमुख अतिथी म्हणून मा.भालगडे सर उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात स समूहाच्या संस्थापिका अल्का धोंडणे- साखरे  यांनी समूहाचा आलेख वाचून दाखवला. दीपोत्सव मैत्रीचा या दिवाळी अंकाचे प्रकाशन व साहित्य क्षेत्रात आपल्या कार्यातून कवितेतून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कवियत्री यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्घाटक नीता श्री श्रीमाळ व विद्या दीक्षित यांनी  यावेळी कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या. डी. आर. बांगर सरांचे बदल या विषयावरचे कथाकथन प्रभावी ठरले. शिवा प्रधान यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ व आजचा युवक यावरील परिसंवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भोजन कालावधीत सुगम संगीतां...