Skip to main content

Posts

*कोकण मराठी साहित्य परिषद**ठाणे शहर शाखा आयोजित* *विषय:-मराठी भाषा: आजची परिस्थिती आणि साहित्य संस्था.**एक आगळावेळा परिसंवाद*

ठाणे : दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ठाणे महानगर पालिकेच्या मराठी शाळा क्रमांक १३ खोपट येथील शाळेच्या  हाॅलमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेतर्फे... मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी सदर कार्यक्रम आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी  प्रमुख पाहुणे प्रा. संतोष राणे शारदा प्रकाशन, मा. ज्योती कपिले जे के मिडिया,  मा.किशोर भोईर अस्मिता वाचनालय, डॉ. मनोज वैद्य , अध्यक्ष आणि, सूत्रधार व निवेदक श्री मोरेश्वर बागडे यांच्या अथक प्रयत्नातून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील त्यासाठी आपले नागरिक म्हणून योगदान तसेच पत्रकार, साहित्यिक आणि साहित्य संस्था मिळून काय करता येईल याबद्दल  परिसंवादाचे सूत्रधार श्री मोरेश्वर बागडे यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळींनी परखड विचार मांडले.  त्यावेळी  कार्यक्रमाला हजर असलेले ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतूरकर यांनी मराठी भाषेला हे दिवस कोणी आणले? असा प्रश्न प्रेक्षक म्हणून  व्याख्याते व रसिक प्रेक्षक यांना विचारला. त...

के.एल.पोंदा, डहाणू येथे होळी व धुलिवंदन निमित्ताने विविध उपक्रम!

      होळी व धुलिवंदन हा आनंदाचा, उत्साहाचा सण आपल्या महाराष्ट्रात साजरे केले जातात.या सणाचं महत्त्व लक्षात घेऊन शाळेत पर्यावरण पुरक विविध उपक्रम राबविले गेले.    शाळेचे प्राचार्य श्री.सोपान इंगळे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभेच्छांसह उपक्रम संपन्न झाले.होळीच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय हरित सेना व के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.यावेळी वेग वेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली. यातून झाडे लावा,झाडे जगवा संदेश देण्यात आला.                 होळी व धुलिवंदन सणानिमित्त देखील विविध उपक्रम... निबंध लेखन,यात पर्यावरण संवर्धन काळाची गरज!, तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, भेट कार्ड (ग्रिटींग कार्ड) तयार करणे, काव्यलेखन,काव्य वाचन, सादरीकरण, कथाकथन,असे विविध उपक्रम,शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका,सौ.अनुपमा जाधव यांनी या उपक्रमांचे आयोजन केले. यात इयत्ता ५वी ते९वीच्या  इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.           ...

संत एकनाथ

शांती ब्रम्ह रूप!एकचं प्रारूप! अवतार रूप! एकनाथ!!1 जन्मचं पैठणी! विद्या वान गुणी! होतीच सुवाणी! धर्मज्ञानी!!2 भक्ती अंगी भिने! शक्ति रूप भासे! प्रभोधन दिसें! वाणीतून!!3 हरी भरी पाणी! संत होते गुणी  अभंग गौळणी! रचिल्यात!!4 आदर्श वागणं! सुंदर जगणं! साधंच राहणं! जीवनात!!5 सांप्रदाय नाथ! जनार्धन स्वामी! ज्ञान  आलं कामी! जगण्यात!!6 मी आणि तु भेद! नष्ट कर्ते झाले! कार्य खुप केले! जीवनात!!7 प्राणी मात्रा जीव! एकच सारेच! वाहिले वारेच! ज्ञानातुनी!!8 संत एकनाथ! उभय राष्ट्रात  सांगे अभंगात! प्रदीपचं!9©️®️ प्रदीप मनोहर पाटील  गणपूर तालुका चोपडा  जिल्हा. जळगाव. मो. 9922239055

अमरावतीच्या संस्थेचा विनोद अष्टुळ यांना महाराष्ट्र भूषण

पुणेः प्रतिनिधी अमरावती येथील कला जीवन बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा डॉ अलका नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हडपसर येथे बहुभाषिक द्विशतकीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले . संमेलनाध्यक्ष आचार्य रतनलाल सोनग्रा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे शहराध्यक्ष रा.काँ.( शरद चंद्र पवारगट) प्रशांतदादा जगताप, माजी महापौर वैशालीताई बनकर, माजी नगरसेवक सुनीलदादा बनकर, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, ज्येष्ठ गजलकार म भा चव्हाण, प्राचार्य सूर्यकांत वैद्य, कविसंमेलनाध्याक्षा प्रतिभाताई मगर, समाजसेवक दादासाहेब सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.        साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ व संस्थेच्या सचिव सौ.अर्चना अष्टुळ हे गेली तेरा वर्षापासून कवी कट्टा  अव्याहतपणे सुरु ठेवला आहे. मराठी भाषा संवर्धनासाठीची रात्रदिवस सेवा करत आहेत म्हणूनच या संस्थेच्या वतीने   पुरस्कार देवून   गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य सम्राट च्या सदस...

प्रदीप बडदे यांना मराठी साहित्य मंडळाचा कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला.

             ठाणे: नवी मुंबईतील कवी/लेखक/पत्रकार प्रदीप बडदे यांना नुकताच मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य उपेक्षितांचे या मासिकाचे ते कार्यकारी संपादक असून मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात येथील विविध साहित्यिक मंचावर संचालक व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप बडदे हे गेल्या वीस वर्षांपासून साहित्यक्षेत्रात कार्यरत असून त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व राष्ट्रस्तरीय अशी ४० हून अधिक पारितोषिके व पुरस्कार प्राप्त आहेत.              रविवार, दिनांक १६ मार्च २०२५ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, रेगे सभागृह, ठाणे येथे ज्येष्ठ साहित्यिक मा.अशोक बागवे, मा.डॉ. विनायकराव जाधव, मा. सिद्धार्थ कुलकर्णी, मा.जयप्रकाश घुमटकर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन मराठी साहित्य मंडळ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र कवडे यांनी मोठ्या थाटात केले आहे. सूत्रसंचालन अनघा जाधव व विद्या थोरात काळे करणार आहेत.

जे जे रुग्णालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या जल्लोषात साजरा

ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे जे रुग्णालय येथे मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.  कार्यक्रमाचे प्रेरणास्थान असलेल्या  जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे मॅडम या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच जे जे रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.  बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. कुंदन गोसावी डॉ.  अश्विन सोनकांबळे यांनी निबंध स्पर्धा,  काव्यवाचन, पुस्तक ओळख, पोवाडा मराठी गाणी आदींचा समावेश करून कार्यक्रम सुंदरपणे पार पडला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विविध पुरस्कार प्राप्त श्रीमती वर्षा फटकाळे वराडे या उपस्थित होत्या. मा. अधिष्ठाता डॉ.  सापळे आणि विशेष अतिथी,  श्रीमती वर्षा वराडे यांनी मराठी भाषेचा इतिहास व थोरवी सांगून  आपल्याला दैनंदिन कामकाजात मराठी भाषा जास्तीत जास्त कशी वापरात आणता येईल याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या व्यस्त रुग्णसेवा आणि प्रशिक्षण यातून वेळ काढून वरिष्ठ डॉक्टर्स, प्राध्यापक, नर्सिंग स्टाफ आणि वैद्यकीय विद्यार्थी यांनी देखील कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ...

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जे जे रुग्णालयात प्रमुख अतिथी म्हणून सौ. वर्षा वराडे यांचा सन्मान

जे जे रुग्णालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या जल्लोषात साजरा  ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे जे रुग्णालय येथे मराठी भाषा गौरव दिनाचा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.  कार्यक्रमाचे प्रेरणास्थान असलेल्या  जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे मॅडम या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच जे जे रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.  बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. कुंदन गोसावी डॉ.  अश्विन सोनकांबळे यांनी निबंध स्पर्धा,  काव्यवाचन, पुस्तक ओळख, पोवाडा मराठी गाणी आदींचा समावेश करून कार्यक्रम सुंदरपणे पार पडला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विविध पुरस्कार प्राप्त श्रीमती वर्षा फटकाळे वराडे या उपस्थित होत्या. मा. अधिष्ठाता डॉ.  सापळे आणि विशेष अतिथी,  श्रीमती वर्षा वराडे यांनी मराठी भाषेचा इतिहास व थोरवी सांगून  आपल्याला दैनंदिन कामकाजात मराठी भाषा जास्तीत जास्त कशी वापरात आणता येईल याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या व्यस्त रुग्णसेवा आणि प्रशिक्षण यातून वेळ काढून वरिष्ठ डॉक्टर्स, प्राध्यापक, नर्सिंग स्टा...