Skip to main content

Posts

पुणे येथे सकल धनगर समाजाच्या राज्य व्यापी अधिवेशनाचे आयोजन

. शनिवार दिनांक १० आगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुणे येथे सकल धनगर समाजाच्या राज्य व्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.पुणे येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतीक भवन,गंज पेठ पुणे या ठिकाणी " एकच नारा, धनगर सारा"," लढा एसटी प्रमाण पत्र मिळेपर्यंत" ," ना नेता,ना पक्ष आता एसटी आरक्षण हेच लक्ष" ," देऊ आता एक नारा,करु धनगर एक सारा" ," काम जुने च पण नव्या दमाने करायचे", आदी गोष्टी वर विचार विनिमय करून पुढचे ठोस पाऊल उचलण्यासाठी सकल धनगर समाज राज्य व्यापी अधिवेशन भरविते आहे.या राज्य व्यापी अधिवेशनात धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार कवी लेखक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.धनगर समाजाने आजपर्यंत एसटी आरक्षण साठी खूप च संघर्ष केला आहे.अजूनपर्यंत यश मिळाले नाही, परंतु आता मात्र जुने काम (एसटी आरक्षणचे) नव्या दमाने करायचे, असे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांनी ...

बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जागतिक पातळीवर जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन

. भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  बारामती मध्ये रविवार दिनांक ११आगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता रयत भवन मंगल कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जागतिक पातळीवर जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बबनराव आटोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.या जयंती उत्सवात मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन करण्यात येणार आहे.मान्यवरांचे सत्कार, मान्यवरांचे मार्गदर्शन, विशेष सत्कार, समाजातील समाज बांधवांनी व भगिनी यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरुषांना समाज भूषण पुरस्कार व महिलांना अहिल्या रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती महोत्सवा साठी समिती चे अध्यक्ष बबनराव आटोळे, उपाध्यक्ष अँड.गुलाबराव गावडे, कार्याध्यक्ष गोविंदराव देवकाते, सरचिटणीस महेंद्र खटके, समन्वय अनिल आटोळे, संपर्क प्रमुख गजानन भगत,संघटक वीर धवल गाडे,व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.मुंबई कांदिव...

वाकडी येथे साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

महापुरुषांच्या जयंत्या खऱ्या अर्थाने साजरा करायच्या असेल तर त्यांचे कार्य आपल्या कृतीत दिसले पाहिजे - संपादक नितीन गायके नेवासा प्रतिनिधी:- वाकडी ता. नेवासा जि. अहमदनगर येथे साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्री. माननीय विठ्ठलराव लंघे पाटील, श्री. निलेश सरोदे, दैनिक साहित्य सेवा संपादक श्री.नितीन गायके, ज्येष्ठ साहित्यिक श्री. सायमन भारस्कर,श्री कचरू गाढे,  श्री. अंकुश काळे वाकडी गावचे सरपंच संभाजी काळे हे मान्यवर उपस्थित होते.  तसेच मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात नितीन गायके सर यांच्या परखड भाषाशैलीने झाली. ज्यांनी समाजासाठी लढा दिला आपले जीवन समाजासाठी खर्च केले या महापुरुषांच्या जयंत्या खऱ्या अर्थाने साजरा करायच्या असेल तर त्यांचे कार्य आपल्या कृतीत दिसले पाहिजे. क्रांतिकारक बदल झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी निर्मित केलेले साहित्य वाचावे.  तसेच या महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करा परंतू त्याआगोदर  प्रथम त्यांचा अभ्यास करा व आपल्या वर्तनात बदल आणा. त्यां...

*ग्रामीण कवी श्रीराम घडे यांचे रुमणं हा काव्य संग्रह प्रकाशित*

राणीसावरगाव येथील ग्रामीण कवी श्रीराम घडे यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील संघर्षाची व्यथा मांडणाऱ्या कविताचा समूह असलेला रूमणं हा कविता संग्रहाचे प्रकाशन पाठयपुस्तक कवी हनुमंत चांदगुडे व काव्यवाणी काव्यसंस्था पुणे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजयुवा प्रकाशन पुणे यांनी अप्रतिम काव्यसंग्रह केला आहे आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ मा नंदू वानखडे सर यांनी स्वतःच्या हाताने चित्र काढून माझ्या काव्यसंग्रहाची शोभा  त्यांचे गौरव पुंडे सर मनःपूर्वक आभार .या नंतर *महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी चित्रपट गीतकार, कथा निवेदक, लेखक तथा पाठयपुस्तक कवी श्री हनुमंत चांदगुडे यांचा श्री संगमेश्वर बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने 2024 चा महाराष्ट्र भूषण साहित्य गौरव पुरस्कार शॉल श्रीफळ,सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला*,या नंतर कवी हनुमंत चांदगुडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या करिअर बद्दल मार्गदर्शन केले व साहित्याची आवड असणारा विद्यार्थी स्वकर्तृत्वावर यशाची गरुड भरारी घेऊ शकतो असे सांगून त्यानीं लिहलेल्या इयत्ता आठवी...

*विनोदी टाईमिंगचा बादशहा : दादा कोंडके**८आँगस्ट रोजी जयंती निमित्त*

      नाटकाला शोभेल अशी शरीर यष्टी नाही, प्रभावित करेल असे रुपही नाही, तरीही दादा कोंडके नावाच्या अवलियाने तमाम मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले. ज्यांच्याकडून मराठी शब्दाचा शब्द न शब्दाचा अर्थ सविस्तरपणे शिकावं तसेच ज्याच्या नावावर चित्रपट चालतात आणि प्रेक्षक पुन्हा-पुन्हा गर्दी करतात. अशा काही मोजक्या भाग्यवंत कलाकारांपैकी दादा एक.        दादा कोंडके यांचा जन्म ८ आँगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगाव परिसरातील गिरणी कामगाराच्या घरात झाला.त्यामुळे त्यांचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले.बालपणापासूनच दादा वात्रट होते. मस्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली. त्यामुळे ते राहत असलेल्या मुंबईच्या परळ, नायगाव भागात खोड्या-भांडण करणारा म्हणून दादांची ओळख होती, त्यांच्या रोजच्या त्रासाला त्यांची आई सखुबाई वैतागलेली असायची, त्यांचे वडील खंडेराव हे गिरणीत कामाला होते. भविष्यात पोराचे कसे होणार? ही चिंता दादांच्या आई-वडिलांना सतत भेडसवायची. अभ्यासतही दादांचे फारचे लक्ष नसायचे. गुंडगिरी करणाऱ्या मित्रांच्या सहवासात त्यांचा जास्तीत जास्त वेळ जात असे.    ...

जीवनी आलो तर अर्थ पण समजून घेऊ - सौ. वसुधा वैभव नाईक.

         अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे आयोजित तिसरे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन याच्या संमेलन अध्यक्ष माननीय सौ.वसुधाताई नाईक, सुप्रसिद्ध साहित्यिका या होत्या.     संमेलनाचे उद्घाटन  अ. भा.म. सा. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. शरद गोरे यांनी केले.           .जि.संघटक,शिवसेना  मा. श्री. निलेश दादा काळभोर  व अ. भा. म. सा. प. उपाध्यक्षा श्रीमती शुभांगी ताई राजकुमार काळभोर हे होते.     मा.शरदजी गोरे यांनी आपल्या भाषणात माणसाच्या भावना,चेतना याचे बिजारोपण साहित्यिक करत असतात. माणुसकी हा एक धर्म आहे. आणि स्त्री-पुरुष ही जात आहे. लालसा कोणाच्याही मनात नसावी. स्त्रीचे स्थान खूप मानाचे आहे. त्याचप्रमाणे संमेलनाचा रथ अनेक साहित्यिकांच्या  हाताने पुढे नेला जातो असे त्यांनी सांगितले.   मा. सौ. वसुधाताई नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणाला गणेश वंदनाने सुरुवात केली. स्वर्गीय राजकुमार काळभोर यांचा थोडक्यात परिचय दिला. हा सन्मान शरद गोरे या...