Skip to main content

Posts

पंढरपूर मध्ये धनगर बांधवांचे एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता राज्य व्यापी आमरण उपोषण.

मुंबई प्रतिनिधी - भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता शेकडो धनगर समाजातील बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसणार आहेत.डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला संविधानामध्ये एसटी आरक्षण दिलेले असून ही गेल्या 75 वर्षांपासून धनगर समाज एसटी आरक्षणापासून वंचित आहे.काही बोटावर मोजणारे नेते प्रत्येक पक्षाच्या सोबत जाऊन त्या पक्षाने अख्खी धनगर जमात वेठीस धरली आहे.आतापर्यंत जमातीला हाताशी धरून नेते मोठे झाले आहेत.पण आता जमात मोठी आहे समजून संघटित पणे आंदोलन करुन सरकारला परिपत्रक काढायला भाग पाडू.या उद्देशाने सकल धनगर जमातीतील सुशिक्षित तरुण, सामाजिक कार्यकर्ता, आणि उपोषण करणारे यांनी ना पक्ष ना नेता, जुनेच काम नव्या दमाने करायचे ठरवून एकत्र येऊन पंढरपूर मध्ये 9 सप्टेंबर रोजी शेकडो धनगर समाज बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसणार आहेत.सोडा मतभेद सोडा विचार भेद , एकदा समाजासाठी संघटित होऊ या ,अभि नहीं तो कभी नहीं,असे आवाहन सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे. भारत कवितके मुंबई...

लेखन :- वास्तविकतेचे ज्ञान देणारे शिक्षक (शिक्षक दिन)

शिक्षक हे असे मार्गदर्शक... जे ज्ञानदक्षिणा जरी घेत असले... तरी मुलांना ज्ञान शिदोरी तळमळतेने देत असतात.         आमचे शिक्षक पहिल्या दिवसापासून सांगायचे, मुलांनो महाविद्यालयात आलात म्हणजे अभ्यास संपला,अन् मज्जा,मस्ती ,फिरणे,मनाला येईल तसे वागणे नव्हे.महाविद्यालयात प्रवेश केलात म्हणजे तुम्ही मोठे झालात.जबाबदार झालात. महाविद्यालयीन ज्ञान तुम्हाला खऱ्या जीवनात जगताना,स्वबळावर उभे राहताना उपयोगी पडणार आहे.मज्जा मस्ती,दंगा शालेय वयात केलात तेवढे पुरे झाले आता.                पण काही मुले मात्र महाविद्यालयात गेल्यावर कानात वारे शिरावे तसेच वागायचे.शिक्षकांनी कितीही सांगितले तरी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे.असे वागणे त्याच मुलांचे होते,ज्यांना अभ्यासाची आवडच नसायची.आम्ही मात्र असे नव्हतो.              काही मुले खुप हुशार,शांत,अभ्यास एके अभ्यास, कोणाशी बोलणे नाही,अभ्यास करून शिक्षकांच्या मनावर राज्य करणारी,पण आम्ही यातले सुद्धा नाही बरं का...!       ...

*विषय- माझे आवडते शिक्षक*

 *गुरु ब्रम्हा गुरु विष्णु*   *गुरूदेवो  महेश्वरा*   *गुरुसाक्षात परब्रम्ह*   *तस्मै:श्री गुरवे नमः-----*   माणसाची पहिली गुरु त्याची जन्मदात्री आई असते. त्यानंतर शाळेतील गुरु. ज्यांच्याकडून आयुष्याची जडणघडण शिकायची असते हातात हात घेउन अ आ इ ई ज्या गुरुने मला शिकवले. त्यांना आज माझे प्रथम नमन.        कारण,  आईला सोडून बाळ पहिली पायरी चढते. ती पायरी प्राथमिक शाळेची असते. अंगणवाडीत ते आईबरोबरच असतात संस्कार आणि बालपणाचे बाळकडू पिऊन प्राथमिक शाळेत येते. " नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा"  गुरु बिना ग्यान नही हे मी शाळेत आल्यावरच शिकले. दररोज होणाऱ्या,  प्रार्थने पासून रामरक्षा गणपती स्तोत्र. चाली नुसार कविता गायन मी गुरूकडून शिकले. ते माझे आचारी सर. आज ते हयात नाही. पण नकळत त्यांच्या चरणी मस्तक माझे  नमले.       सोज्वळ प्रसन्न चेहरा निखळ वाणी, रुबाबदार पेहराव आणि फणसासारखे वरून काटेरी असले तरी, आतून मऊ गऱ्या सारखे असणाऱ्या माझा गुरूंचा स्वभाव, साधी राहणी,  उच्च विचारसर...

गुरू चरणी

गुरु चरणी गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! आई बापाच्या नंतर मान जातो तो गुरूला पेन पेन्सिल धरुनी शिकवतो लिहायला.. गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! दुर अज्ञान करून दिवा ज्ञानाचा लावतो निराशेचा अंधकार दूर क्षणात करतो.. गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! गुरु ज्ञानाचा उगम झरा प्रेमाचा अखंड दाही दिशात प्रसार नसे त्यात कधी खंड गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! मनी भेदभाव नसे चुका समजून घेई तोल न जाऊ देणारे फक्त गुरुजन आई गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! गुरु चरणी सर्वदा धैर्य शौर्य कीर्ती वसे देवरूपी मूर्तीमंत चराचरी गुरु दिसे.... गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! श्री. बालाजी नाईकवाडी धाराशिव  9922764350

*५ सप्टेंबर "शिक्षकदिन"**औचित्य साधून**विषय:- डॉ. सर्वपल्ली* *राधाकृष्णन् व्यक्ती आणि व्यक्तिमत्व*

   ५ सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण भारतभर 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो.    गुरुजन हे वंदनीय आहेत परब्रम्ह स्वरूप आहेत. या वंदनीय अशा गुरुजींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण राष्ट्रीय स्तरावर ५  सप्टेंबर हा 'सर्वपल्ली राधाकृष्णन 'यांचा जन्मदिवस साजरा करतो.    राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ साली आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी  गावी झाला. नेहमी प्रथम वर्गात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.      त्यानंतर त्यांनी प्राध्यापकाचा पेशा पत्करला. तत्त्वज्ञानावरील त्यांचे ग्रंथ व व्याख्याने देश विदेशात गाजली आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना खास धर्मनितीशास्त्र व तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यानांसाठी सन्मानपूर्वक बोलवले होते.      ते वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे तसेच बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा होते.१९३१  ते १९३९ पर्यंत ते राष्ट्र संघात भारताचे प्रतिनिधी देखील होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यां...

||शिक्षक||

जग त्याच सुंदर असतं  चिमुकल्या फुलांनी गजबजलेलं  प्रश्नोत्तरांनी सजलेलं  देशाच्या भविष्यात गुंतलेलं  आदराचं,पवित्र असं त्याच पद  निरागस,निष्पाप, निर्मळ  भावनेच ते एक जग असतं  ज्ञानमंदीरात त्याच वास्तव्य असतं  ज्ञानदानाचं अविरत कार्य तो करतो  विद्यार्थ्यांसाठी तो झटतो  भाव प्रगतीचा शिष्याच्या मनात जागवतो  एक अख्खा समाज तो घडवतो  शिक्षक आयुष्याचा निर्माता आहे  तो समाजाचा आरसा आहे  तो विद्यार्थ्याचा एक आदर्श आहे  शिक्षक हा ज्ञानमंदीराचा पुजारी आहे  व्हाव मनाने हाडाने शिक्षक  राखावे पावित्र्य या पेशाचे  करावे सदैव कार्य नेक  धडे द्यावे समाजास आदर्शाचे  गजानन दशरथ पोटे  अकोला  9923208775

शिक्षक दिन

सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निस्वार्थ भावनेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षित करून त्यांना उच्च स्थानावर पोहोचवण्याचे श्रेय केवळ शिक्षकांना जाते.शिक्षक हे आपले दुसरे पालक आहेत.आपल्यावर प्रभाव पाडण्यात आणि प्रेरित करण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आपला आदर्श मानतो. पालकांनंतर, प्रत्येक टप्प्यावर मुलाचे चारित्र्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे आज शिक्षकांना आणि त्यांच्या अथक परिश्रमांना सलाम करणे हे आपले परम कर्तव्य आहे.शिक्षक आणि माळी हे दोघे सारखेच असतात जसं माळी एकाच बागेत विभिन्न प्रकारची सुंदर फुले फुलवतात तसेच शिक्षक सुद्धा अनेक विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार घडवून त्यांच्या सुगंधाने समाज सजवण्याचा प्रयत्न करत राहतात. काट्यात राहून फुलण्याचे सामर्थ्य जसे फुलांच्या अंगी असते तसेच सामर्थ्य आणि बळ आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यावी यासाठी ते अविरत झिजत राहतात.शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान देत नसून समाजामध्ये उच्च दर्जाचे जीवन जगण्याची कला शिकवतात. शिक्षक आपल्या आय...