Skip to main content

Posts

धनगर समाजातील प्रसार माध्यमांनी पंढरपूर मधील राज्य व्यापी आमरण उपोषणाचा प्रसार व प्रचार करावा.... भारत कवितके यांचे आवाहन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. धनगर समाजातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियानी धनगर समाजाच्या पंढरपूर मधील शेकडो धनगर समाज बांधवांच्या राज्य व्यापी आमरण उपोषणाचा प्रसार व प्रचार करावा असे आवाहन मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी केले आहे.संविधानात धनगर समाजाचे एसटी आरक्षण समाविष्ट असताना देखील आज वर सत्तेवर असलेल्या जवळ जवळ सर्वच पक्षांनी दुर्लक्ष केले.पण आता मात्र एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाज पुन्हा एकवटला आहे.9 सप्टेंबर सोमवार पासून सामूहिक पणे शेकडो धनगर समाज बांधव (मल्हार यौध्दे) राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसणार आहेत.धनगर समाजातील प्रसार माध्यमांनी मात्र या बाबतीत पाहिजे तेवढा प्रसार व प्रचार केलेला दिसून येत नाही.समाजाच्या प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियावर संपादक, पत्रकार, प्रतिनिधी कार्यरत आहेत.परंतु पंढरपूर येथील राज्य व्यापी आमरण उपोषणाच्या बातम्या पाहिजे तेवढ्या प्रसिद्ध झाल्या नसल्याने महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधव या बाबतीत अजूनही जागृत नाही.या उपोषण आंदोलनाची कल...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री मनोज महाजन सर आय इ एस नवी मुंबई हायस्कूल वाशी यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक सवर्गातून आय इ एस नवी मुंबई हायस्कूल वाशी चे उपक्रमशील, तंत्रस्नेही, इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक, NEP वर आधारित क्षमता वृद्धी प्रशिक्षण ठाणे जिल्हा तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी बजावली होती असे अष्टपैलू शिक्षक श्री मनोज महाजन यांना हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळाला मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातीत टाटा सेंटरमध्ये हा सोहळा ५ सप्टेंबर 2024 रोजी पार पडला  सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, , शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब, मा. श्रीमती आय.ए.कुंदन प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, मा. शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरे साहेब , उपस्थितीत होते मनोज महाजन सर यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श...

मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द शाळेतील श्री चंद्रकांत खोसे 'आदर्श शिक्षक ' पुरस्काराने सन्मानित

  श्री. चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर गेली  गेली २६ वर्षे पनवेल घाटकोपर लिंक रोड हायवेला असलेल्या मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द झोपडपट्टी विभागात असलेल्या माध्यमिक विभागात सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत.ते कवी व कथालेखक  ही आहेत त्यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटविला आहे. त्यांना आजतागायत २१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे व  काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी १००० प्रमाणपत्र ही प्राप्त केली आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन  दिनांक ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२४ रोजी  ऑनलाईन "आदर्श शिक्षक " पुरस्कारांच्या निवडीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते व त्यात महाराष्ट्रातून अनेक पुरस्कारांतून  १२ शिक्षकांची " आदर्श शिक्षक " पुरस्कारासाठी निवड झाली त्यात श्री  चंद्रकांत खोसे सर यांचेही नाव झळकले व भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच (रजि ) उत्तर महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते ५ सप्टेंबर २०२४ रोजी ऑनलाईन "आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष: श्री. मा.विशाल मिसा...

पंढरपूर मध्ये धनगर बांधवांचे एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता राज्य व्यापी आमरण उपोषण.

मुंबई प्रतिनिधी - भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता शेकडो धनगर समाजातील बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसणार आहेत.डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला संविधानामध्ये एसटी आरक्षण दिलेले असून ही गेल्या 75 वर्षांपासून धनगर समाज एसटी आरक्षणापासून वंचित आहे.काही बोटावर मोजणारे नेते प्रत्येक पक्षाच्या सोबत जाऊन त्या पक्षाने अख्खी धनगर जमात वेठीस धरली आहे.आतापर्यंत जमातीला हाताशी धरून नेते मोठे झाले आहेत.पण आता जमात मोठी आहे समजून संघटित पणे आंदोलन करुन सरकारला परिपत्रक काढायला भाग पाडू.या उद्देशाने सकल धनगर जमातीतील सुशिक्षित तरुण, सामाजिक कार्यकर्ता, आणि उपोषण करणारे यांनी ना पक्ष ना नेता, जुनेच काम नव्या दमाने करायचे ठरवून एकत्र येऊन पंढरपूर मध्ये 9 सप्टेंबर रोजी शेकडो धनगर समाज बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसणार आहेत.सोडा मतभेद सोडा विचार भेद , एकदा समाजासाठी संघटित होऊ या ,अभि नहीं तो कभी नहीं,असे आवाहन सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे. भारत कवितके मुंबई...

लेखन :- वास्तविकतेचे ज्ञान देणारे शिक्षक (शिक्षक दिन)

शिक्षक हे असे मार्गदर्शक... जे ज्ञानदक्षिणा जरी घेत असले... तरी मुलांना ज्ञान शिदोरी तळमळतेने देत असतात.         आमचे शिक्षक पहिल्या दिवसापासून सांगायचे, मुलांनो महाविद्यालयात आलात म्हणजे अभ्यास संपला,अन् मज्जा,मस्ती ,फिरणे,मनाला येईल तसे वागणे नव्हे.महाविद्यालयात प्रवेश केलात म्हणजे तुम्ही मोठे झालात.जबाबदार झालात. महाविद्यालयीन ज्ञान तुम्हाला खऱ्या जीवनात जगताना,स्वबळावर उभे राहताना उपयोगी पडणार आहे.मज्जा मस्ती,दंगा शालेय वयात केलात तेवढे पुरे झाले आता.                पण काही मुले मात्र महाविद्यालयात गेल्यावर कानात वारे शिरावे तसेच वागायचे.शिक्षकांनी कितीही सांगितले तरी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे.असे वागणे त्याच मुलांचे होते,ज्यांना अभ्यासाची आवडच नसायची.आम्ही मात्र असे नव्हतो.              काही मुले खुप हुशार,शांत,अभ्यास एके अभ्यास, कोणाशी बोलणे नाही,अभ्यास करून शिक्षकांच्या मनावर राज्य करणारी,पण आम्ही यातले सुद्धा नाही बरं का...!       ...

*विषय- माझे आवडते शिक्षक*

 *गुरु ब्रम्हा गुरु विष्णु*   *गुरूदेवो  महेश्वरा*   *गुरुसाक्षात परब्रम्ह*   *तस्मै:श्री गुरवे नमः-----*   माणसाची पहिली गुरु त्याची जन्मदात्री आई असते. त्यानंतर शाळेतील गुरु. ज्यांच्याकडून आयुष्याची जडणघडण शिकायची असते हातात हात घेउन अ आ इ ई ज्या गुरुने मला शिकवले. त्यांना आज माझे प्रथम नमन.        कारण,  आईला सोडून बाळ पहिली पायरी चढते. ती पायरी प्राथमिक शाळेची असते. अंगणवाडीत ते आईबरोबरच असतात संस्कार आणि बालपणाचे बाळकडू पिऊन प्राथमिक शाळेत येते. " नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा"  गुरु बिना ग्यान नही हे मी शाळेत आल्यावरच शिकले. दररोज होणाऱ्या,  प्रार्थने पासून रामरक्षा गणपती स्तोत्र. चाली नुसार कविता गायन मी गुरूकडून शिकले. ते माझे आचारी सर. आज ते हयात नाही. पण नकळत त्यांच्या चरणी मस्तक माझे  नमले.       सोज्वळ प्रसन्न चेहरा निखळ वाणी, रुबाबदार पेहराव आणि फणसासारखे वरून काटेरी असले तरी, आतून मऊ गऱ्या सारखे असणाऱ्या माझा गुरूंचा स्वभाव, साधी राहणी,  उच्च विचारसर...

गुरू चरणी

गुरु चरणी गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! आई बापाच्या नंतर मान जातो तो गुरूला पेन पेन्सिल धरुनी शिकवतो लिहायला.. गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! दुर अज्ञान करून दिवा ज्ञानाचा लावतो निराशेचा अंधकार दूर क्षणात करतो.. गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! गुरु ज्ञानाचा उगम झरा प्रेमाचा अखंड दाही दिशात प्रसार नसे त्यात कधी खंड गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! मनी भेदभाव नसे चुका समजून घेई तोल न जाऊ देणारे फक्त गुरुजन आई गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! गुरु चरणी सर्वदा धैर्य शौर्य कीर्ती वसे देवरूपी मूर्तीमंत चराचरी गुरु दिसे.... गुरू असतात असे, जीवनाचा शिल्पकार जसे ! श्री. बालाजी नाईकवाडी धाराशिव  9922764350