नऊ दिवस झाली तुझी मोठ्या थाटामाटात पुजा.या काळात मिळाला तुझ्या काहीं भगिनींना मानसन्मान.त्या किती ग २०% ही नसतील .पण,उरलेल्या ८०% महिलांचे काय? समानताच नांदतांना दिसत नाही... दिसतो सोयराचार...बोलले तर फार बोलते? किंवा बोलतो?आवाज दाबायचा,प्रकरणे दाबायची,अन् बे एके बे, पाढा पुढे चालू.... असे कित्येक वर्षे गेले,अन् अजून असेच कित्येक वर्षे जातील? तिला न्याय कधी मिळणार? समानता कधी मिळणार? प्रश्न टांगणीला राहणार..पुन्हा हे रहाटगाडगे चालू... हे असेच चालायचे. कोणाला आईच्या दुधाची किंमत तर समजली पाहिजे ना? एका महिलेला दुसऱ्या महिलेची किंमत जेव्हा समजेल ना तेव्हा कोठे समाज जागृत होईल. तीच तिची वैरी बनते.किंवा दाखविली जाते,की भासावली जाते? की, खरचं ९० % महिलाच याला कारणीभूत असतील.जेव्हा आई म्हणून नाही तर एक महिला म्हणून विनाकारण त्रास देणाऱ्या मुलाला तेथेच शिक्षा करावी म्हणजे असे हिंसक राक्षस वाढणार नाहीत.कितीतरी दुर्घटना घडल्या असतील या १० दिवसात,पण,त्या उघड नाही केल्या गेल्या..कारण नऊ दिवस नवरात्र होती ना?...उपभोग म्हणून किती दिवस तिच्याकडे असे पाहणार काही...