Skip to main content

Posts

सर्व प्रियजनांना सस्नेह नमस्कार शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४पितळखोरा लेणी - अभ्यास दौरा (लेणी वर्णणासहीत)

     *दान पारमिता फाऊंडेशन -  नाशिक*  या लेणी संवर्धक संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण अंदाजे १०० ते १२५ लोक पिताळखोरा लेणी येथे क्षेत्र भेट केली.निमित्त होतं एक दिवशीय कार्यशाळा.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुनील खरे सर आणि त्यांचं प्रतिरूप असलेले संस्थेचे मुख्य पदाधिकारी सन्माननीय संतोष अंभोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा सुव्यवस्थित संपन्न झाली.संस्थेच्या माध्यमातून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी भारतातील प्राचीन धम्मलिपी ऑनलाईन पध्दतीने शिकून झाले आहेत.धम्मलिपी शिकविणे व लेणी संवर्धनासाठी कार्यशाळा घेणे असे उपक्रम संस्था नियमित राबवित असते.मी या संस्थेशी एक विद्यार्थी म्हणून जोडला गेलो व आज संस्थेचा एक पदाधिकारी म्हणून कामकाज करीत आहे याचं मला खूप अप्रूप व समाधान वाटतं.ही कार्यशाळा दिवसभर चालली.मुख्यपदाधिकाऱ्यांनी लेणीची अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना सांगितली.धम्मलिपी मध्ये लिहलेले प्राचीन शिलालेख वाचून दाखवले त्याचं मराठी अनुवादही सांगितले.सदर शिलालेख धम्मलिपी मध्ये लिहलेले आढळत असून शिलालेखांची भाषा प...

आरटीओच्या ई प्रणाली नियमाच्या धोरणामुळे रुग्णवाहिका सेवा अडचणीत.

पनवेल / प्रतिनिधी  रुग्णवाहिका ही अत्य आवश्यक सेवेमध्ये मोडत असून त्याच्यावर वेग मर्यादाच नियंत्रण  आणले आहे.  आरटीओच्या ई प्रणाली नियमामुळे  रुग्णवाहिकाच्या  वेगाला  ला लगाम लागणार आहे. या लगामामुळे रुग्णाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रुग्णांना नेताना रुग्ण सिरीयस कंडिशन होण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे. या घडणाऱ्या दुर्घटनेला आरटीओ प्रशासन जबाबदार राहील. त्याची नोंद प्रशासनाने घ्यावी. कारण पेशंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना रुग्णवाहिका  वेग  इ चलन दंड आकारत आहे. आरटीओ प्रशासनने रुग्णवाहीका  साठी लागणारे इ चलन दंड बंद करण्यासाठी गांभीर्याने विचार करावे. अशी मागणी  महाशक्ती ऍम्ब्युलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य  संघटनेने केली आहे. कोट   रुग्णवाहिकेला वेग मर्यादा लावल्याने रुग्ण हॉस्पिटला पोहोचायला  उशीर होईल.त्या मुळे रुग्णाचा  जीव धोक्यात येऊ शकतो.रुग्ण दगवू शकतो. त्या मुळे आम्ही रुग्णाच्या जीवाशी खेळू शकत नाही  आम्ही रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आमची जीवाची बाजी पणाला लावत असतो....

*नववर्ष साजरे करताना*

   हिंदू नववर्ष चैत्र गुढीपाडव्याला सुरू होते त्यामुळे डिसेंबर नंतर येणारा जानेवारी हा महिना म्हणजे इंग्रजी वर्षातील पहिला दिवस आता त्याचा आनंद साजरा करायचा की नाही याविषयी आपल्याकडे बऱ्याच चर्चा होत असतात त्या फक्त नवीन वर्षाबद्दलच मर्यादित नसून अनेक सणावारांपासून तर अगदी वाढदिवस साजरे करायचे की नाही याबद्दल देखील कायम होत असतात. मग कधी कधी मनामध्ये प्रश्न उभा राहतो की जर जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस नाही, वाढदिवस साजरा करणे ही आपली पद्धत नाही,अनेक असे सण उत्सव आहेत जी साजरे करणे आपल्या हिंदू धर्माला मान्य नाही, मग यांची सुरुवात झाली तरी कुठून, अगदी लहानपणापासून मराठी शाळेत शिक्षण घेत असताना देखील दरवर्षी Happy New year हे शब्द आमच्या कानावर टाकले कुणी,, 25 डिसेंबरला नाताळाची सुट्टी फिक्स असते,, नवीन वर्ष म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी अनेक जाहिराती लावल्या जातात डिस्काउंटच्या,, बऱ्याच वस्तूवर सूट देखील दिली जाते नवीन वर्षाच्या निमित्ताने आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा न देणारे देखील या ऑफर्सची आतुरतेने वाट बघत असतात अगदी छोट्या छोट्या गल्लीपास...

माझ्या शाळेतील ही इयत्ता नववीची मुलं ने नाट्य सादरीकरण सोहळा साजरा

शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ माझ्या शाळेतील ही इयत्ता नववीची मुलं आहेत.... स्थानिक पातळीवर घेतलेल्या नाट्य स्पर्धेत उत्तम अभिनयाचं बक्षीस पटावलं... एक समाधान व आनंद आहे की या मुलांची तालीम मी मागील काही दिवसांपासून घेत होतो... शनिवारी नाट्य सादरीकरण होतं... परंतु मी नेमका याच दिवशी लेणी अभ्यास दौऱ्यासाठी पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर येथे होतो... मी नसतांनाही मुलांनी छान सादरीकरण केले व आज सकाळी शाळेत येताच एक आकर्षक सन्मानचिन्ह घेऊन माझ्याकडे आली व संबंधित इतिवृतांत सांगितला... खूप छान वाटतं आपण अशा कलाकृतीचा एक भाग असतो... संतोष रामचंद्र जाधव  शहापूर जि.ठाणे 7507015488

प्राजक्ता माळी मॅडम यांच्या खाजगी वैयक्तिक आयुष्य बाबतीतील वक्तव्य करण्याचा नैतिक अधिकार कोणाला नाही आहे श्री विकास वायाळ ऍक्टर रायटर डिरेक्टर

  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महिला कलाकार माननीय सन्माननीय आदरणीय प्राजक्ता माळी मॅडम यांच्या बद्दल प्रसार माध्यमाच्या मार्फत जी टिप्पणी केली जाते ती कोणत्याही पुराव्यानिशी खातरजमा न करता कोणतीही बाब सिद्ध झालेली नसताना व तेही चेष्टा मस्करी निंदेने वक्तव्य केली जातात ही बाब अतिशय निंदनीय क्लेशदायक आहे कोणाच्याही खाजगी वैयक्तिक आयुष्य बद्दल वक्तव्य करण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही आहे की जेणेकरून त्या व्यक्तीला मानसिक त्रास होईल त्या व्यक्तीची कौटुंबिक सामाजिक जीवन उध्वस्त होईल त्याचे कला क्षेत्रातील करियर उद्ध्वस्त होईल त्यामुळे त्या व्यक्तीचे मनोबल सच्ची होईल अशा परिस्थितीत त्यांना मानसिक आधार व पाठिंब ची गरज आहे व सर्व चित्रपट संघटनेची ती जबाबदारी आहे  मी श्री विकास वायाळ अॅक्टर राईटर डिरेक्टर  मुंबई प्रदेशाध्यक्ष  अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना  मुंबई प्रदेश उपाध्यक्ष  दादासाहेब फाळके चित्रपट युनियन  सदस्य अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ  सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद  अशी ग्वाही देतो की दादासाहेब फाळके चित्रपट युन...

बोरीवली सुकर वाडी एसटी स्थानकाच्या आवारातील समस्या कडे दुर्लक्ष करु नये... पत्रकार भारत कवितके.भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.

बोरीवली सुकर वाडी एसटी स्थानकाच्या आवारात चक्क मुले किक्रेट खेळतात, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे,या एसटी स्थानकात दिवस रात्र प्रवाशांची जा ये चालू असते, स्थानकांच्या आवारात मुले खेळताना त्यांचा चेंडू महिलाना वृध्दांना,व इतर प्रवाशांना लागतो, वेदना ने प्रवाशी कण्हतो, वेळ प्रसंगी चक्कर येऊन खाली पडतो,या वेळी खेळाणारी मुले एकत्र येऊन प्रवाशांनाच दमदाटी करतात, मध्ये कशाला आला, म्हणून अंगावर धावून जातात, तसेच तेथील शौचालय च्या बाजूला बाहेरील रिक्षा,चार चाकी व इतर खाजगी वाहने अस्ताव्यस्त पार्किंग करुन वाहन चालक शौचालय कडे जातात, त्यांच्या ही वाहनांची काच चेंडू मुळे फुटते,मुले व चालक यांच्या मध्ये जोरदार बाचाबाची होऊन वेळ प्रसंगी मारामारी ही होत असते, बाजूला असलेल्या शेड मध्ये प्रवाशांपेक्षा गर्दुल्ले, दारुडे, भिकारी, बेवारस लोकांनी कायम स्वरुपी आश्रय घेतलेला आढळून येतो.हे लोक प्रवाशांना तिथे धारा देत नाहीत,तिथे थांबू देत नाही, येथील स्थानिक राज्य परिवहन महामंडळ या कडे दुर्लक्ष करीत असताना दिसते, या ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक ...

मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांची पत्रकारांची मातृ संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांच्या नाशिक विभागीय सचिवपदी नियुक्ती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी जाहीर केली. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मनमाड (प्रतिनिधी) : नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांची पत्रकारांची मातृ संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांच्या नाशिक विभागीय सचिवपदी नियुक्ती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी जाहीर केली. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  पत्रकारांची मातृसंस्था असलेली मराठी पत्रकार परिषदेच्या कोअर कमिटीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्तयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विभागीय सचिवांच्या नियुक्त्या करताना तरूणांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्य विश्वस्त  एस. एम. देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, गणेश मोकाशी उपस्थित होते. यावेळी देशमुख आणि नाईक म्हणाले की परिषदेच्या संघटनात्मक रचनेत विभागीय सचिवांना विशेष महत्व आहे. पत्रकारांच्या समस्यांसह आपल्या विभागात सं...