Skip to main content

Posts

*आभार...*

आभार मानणे' तशी एकदम सोपी गोष्ट पण आपण आभार मानण्यात खुपदा स्वतःचा कमीपणा मानतो आणी जिथे आभार मानायचे तिथेही आभार मानत नाही.. माझ्या मते आपण प्रत्येक क्षणी समोरच्याचे मनापासून आभार मानायची सवय लावून घेतली पाहीजे.. येणारा प्रत्येक क्षण आपल्या आयूष्यात काहीतरी नवीन घेऊन येत असतो.. आपल्याला काहीतरी देऊनच जात असतो, काहीही झाल तरी आभार मानत चला.. चांगल्या गोष्टीत तर मानायला हवेतच, पण अगदी वाईट गोष्ट घडली तरीही आभार मानायला विसरु नका.रस्त्यावरुन जाताना ठेच लागली तर त्या दगडाचे मनापासून आभार माना, कारण तो तुम्हाला नीट लक्षपूर्वक चालायला शिकवतोय. एखाद्या जवळच्या व्यक्तीने धोका दिला, फसवल तर त्याचेही आभार माना, तो तुम्हाला माणसं कशी ओळखायची हे शिकवते. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी चांगल कारण असतच.एखाद्याच्या  नजरेत जरी आपली किंमत शुन्य असली तरी कुणासाठी आपण अनमोल सुध्दा असु शकतो..आपली किंमत आधी आपण स्वतः ओळखण खुप महत्वाच असत.. आणी मग इतरांच्या नजरेत ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावं. अर्थात आपल्या मधील चांगल्या गुणांचा विकास करुनच केवळ हे शक्य आहे, हो ना....! हिरकणी सौ.अनिता ...

कांदिवली मधील आंबेडकर मनपा रुग्णालयातील एम.आय.आर.मशिन नादुरुस्त असल्याने गरिब गरजू रुग्णांची होते गैरसोय

. भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालयातील एम.आय.आर.मशिन अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने गरिब गरजू रुग्णांची गैरसोय होताना दिसते.विरारपासून ते मालाड गोरेगाव पर्यंतच्या गरिब रुग्णांना कांदिवली पश्चिम येथील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालयात अत्यंत अल्प दरात सर्व सुख सोयी युक्त उपचार मिळत असतात.अवघ्या २५०० रुपयांत येथे रुग्णांना एम.आय.आर.काढून दिला जातो.ही रुग्णांच्या बाबतीत खूप चांगली गोष्ट आहे,पण गेल्या अनेक दिवसांपासून एम.आय.आर.मशिन नादुरुस्त असल्याने गरिब गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे.खाजगी एम.आय.आर.सेंटर वर मन मानेल तसे पैसे रुग्णांकडून घेऊन एम.आय.आर.काढला जातो,गरिब गरजू रुग्णांना खाजगी सेंटर वर एम.आय.आर.काढणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने शक्य होत नाही.मनपा आंबेडकर रुग्णालयातील एम.आय.आर.मशिन प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्त करून गरजू गरीब रुग्णांच्या सोयीसाठी उपलब्ध करून द्यावे.जेणे करुन रुग्णांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार नाही.

भिडेवाड्यात हो वाड्यात । मुलींची पहिली शाळा । कसा फुलविला । शिक्षणाचा मळा॥

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल मध्ये, कवी मनोहर पवारांचा काव्य जागर . केळवद जि बुलढाणा येथील सुप्रसिद्ध ग्रामिण  कवी, साहित्यिक, मनोहर पवार यांनीआंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल पुणे येथे काव्य संमेलनात बुलढाणा जिल्हयातून सहभाग नोंदविला . यात सावित्रीमाई फुले जन्मऊत्सवा निमित्ताने जागतिक पातळीचे ६०० कवींनी सहभाग नोंदविलात्यामध्ये, दुबई, केरळ, आध्र, तामिळ, दिल्ली, आणि विविध राज्यातून मराठी आणि सत्यशोधक फुले प्रेमींनी सहभाग नोंदविला . या अभूतपूर्व महासंमेलनाचे आयोजक भिडेवाडा कार, विजय वडवेराव यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले . त्यात सावित्रीमाई फुले फातीमा बी,तसेच लहूजी साळवे, महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर संघर्षावर आधारीत नाट्य, एकपात्री, अभिनय, काव्य वाचन, तसेच, गझल, पोवाडे, कट्टा दांडपट्टा, जुदो कराटे, आदी कलांचे प्रात्याक्षिक करण्यात आले . सहभोजन, आणि  स्नेहमिलन कार्यकम झाला . ८० वर्षांच्या वयस्कर आजीपासून ते १५ वर्षांच्या मुली पर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला . सर्वांना भारताचे संविधान व स्मृती चिन्ह तसेच आकर्षक समान चिन्ह प्रदान करण्यात आले .एस. ए म. जोशी सभागृहात ...

*निस्वार्थी लढायाचं यशस्वी होतात ....*

    *शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध,जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही*,हे प्रसिद्ध वाक्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी यांचे आहे.ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले ते नक्कीच चांगला बदल घडवितात.अन्यायाविरुद्ध पेटून उठतात,ते पण निस्वार्थीपणे.कधीच स्वतःचा उदो उदो घडावा असा त्यांचा हेतू नसतो.आपल्या इतिहासात भरपूर व्यक्तिमत्त्व घडून गेले,ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि त्यामुळेच दूरदृष्टीने कार्य त्यांनी त्याही काळात केले.*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर* यांची यावर्षी आपण *त्रिशताब्दी जयंती* साजरी करतो.त्यांना त्या काळात त्यांच्या वडिलांनी व सासऱ्यांनी शिकविले.. त्यामुळेच तर त्या वैचारिक दृष्ट्या सक्षम झाल्या आणि राज्यकारभार सांभाळू शकल्यात ते ही माणुसकीने,निस्वार्थी भावनेने कार्य केले..कोणताही जातीभेद,स्री-पुरुष,गरीब-श्रीमंत असा भेद न करता त्यांनी सामाजिक कार्य केले ते ही स्वतः च्या मालकीच्या( खाजगी) पैशातून....राज्यकारभाराचा( सरकारी तिजोरीतील) कोणताही पैसा या कामी त्यांनी खर्च केला नाही.        त्यांच्या आधीही भरपूर महिला शिक्षित होत्या.त्यांच्या...

तर, नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही : अपर पोलीस आयुक्त संजय जाधव

कल्याण : समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार करत असतात. चौथा स्तंभ म्हणून कार्य करणारा पत्रकार हा उर्वरित तीन स्तंभांवर अंकुश ठेवण्याचे कार्य नेहमीच करत आला आहे. प्रशासन आणि पत्रकारांनी हातात हात घालून काम केल्यास नक्कीच सु-प्रशासन व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी येथे केले. कल्याण पश्चिमेकडील स्वामी नारायण सभागृह येथे प्रेस क्लब, कल्याण च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गौड आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार हा बातमीमध्ये विविध विश्लेषण वापरण्या बरोबरच त्याबाबतचे संदर्भ आणि अन्य माहिती गोळा करून मांडत असतो. अशा प्रकारची पत्रकारिता करणे सोपे काम नाही. त्याचबरोबर, सध्या सुरु असलेल्या इलेक्ट्रॉन...

पत्रकार दिनानिमित्त व्हाईस ऑफ मीडिया तर्फे भोजनदान व फळ वितरण

बल्लारपूर : पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मीडिया मुंबई शाखा बल्लारपूर तर्फे दिनांक 7  जानेवारीला सकाळी 11.00 वाजता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा कार्यवाहक गणेश रहिकवार व माजी नप उपाध्यक्ष सिक्की यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला तसेच विसापूर येथील वृद्धाश्रम येथे वृद्धांना भोजनदान    करण्यात आले यावेळी व्हाईस ऑफ मिडियाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष शंकर महाकाली , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष  मनोहर दोतपेल्ली व मराठी पत्रकार संघ बल्लारपूर तालुका अध्यक्ष रमेश निषाद यांचे प्रमुख उपस्थितीत भोजनदान कार्यक्रम पार पडला यावेळी व्हाईस ऑफ मीडिया चे पत्रकार तालुका संगठक विकास दुपारे,सचिव प्रेम गहलोत ,उपाध्यक्ष  ताहीर शेख , व्हॉईस ऑफ मीडिया सदस्य चेतन गेडाम, डॉ.राकेश कांबळे,राजेश गेडाम, सामाजिक  कार्यकर्ता नहीम भाई, नंदू तीलोकानी, माजी नगसेवक विनोद आत्रम,रोहन कळसकर,शांतिकुमार गिरमिल्ला,  संतोष बरसागडे, तसेच सामाजिक  उपस्थित होते।

ठाणे येथे राजेश साबळे, ओतूरकर लिखित "सु-संवाद आणि प्रश्नचिन्ह? पुस्तकांचे प्रकाशन…

ठाणे-५ जानेवारी २०२५ नववर्षाच्या सुरुवातीलाच वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई आणि नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नीलपुष्प साहित्य मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे, ओतुरकर यांच्या ‘सुसंवाद आणि प्रश्नचिन्ह’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि व्याख्याते डॉ.सुनील कर्वे यांच्या उपस्थितीत आनंद विश्व गुरुकुल, रघुनाथनगर, तीन हात नाका, ठाणे येथे, संपन्न झाले.  याप्रसंगी पाहुणे म्हणून मा.श्री. मोरेश्वर बागडे माजी वित्त आणि विधी अधिकारी महाराष्ट्र राज्य, मा.प्रा.सुरेश डुंबरे आंतरराष्ट्रीय चित्रकार आणि कवी, नीलपुष्पचे जेष्ठ साहित्यिक मा. नरेश पाटील मा. प्रा. मीनाताई कुलकर्णी सुसंवाद लेखिका, सोबत नीलपुष्प सदस्य  रसिक पाहुणे मंडळी, तसेच साबळे सरांचा परिवार, नातेवाईक मित्र मंडळीआवर्जून उपस्थित होते.   सुरुवातीला सर्व उपस्थित पाहुण्यांचे औक्षण करून झाल्यावर मान्यवरांच्या शुभहस्ते गणेशपूजन आणि सरस्वती पूजन झाले. नंतर नीलमपुष्पच्या ज्येष्ठ कवयित्री सौ शशिकला कुंभार यांनी आपल्या सुमधुर आवाजात ईशस्तवन आणि स्वागत गीत सुं...