Skip to main content

Posts

मी बोललचं पाहिजे

हा हा मी मी बोललचं पाहिजे आज नाही तर कधीच मी बोलू शकणार नाही हे मलाही अन् तुम्हालाही चांगलेच माहिती आहे माझा आत्मा गेल्यावर फक्त बॉडी राहील शिल्लक ती काय बोलणार,काय विचार करणार?ती फक्त सरणावर जळणार किंवा या मातीत,कबरेत बंदिस्त होणार म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे.. आज नाही तर कधीच नाही... मला जन्म देण्यासाठीही तू एक स्री असूनही किती विचार करते? देवू का नको या स्री गर्भाला जन्म म्हणून आतून काय आणि कसे सांगू ग आतून किती  मी तुटते किती मी ढासळते,कोसळते,अन् पुन्हा स्वतः स सावरते माझाच जन्म एका स्त्रीला सुद्धा नकोसा झाला? कोठे मागणार मी दाद सांगा तुम्हीच मला म्हणूनच मी आता बोललचं पाहिजे.. आज नाही तर कधीच नाही... धन्य मायबाप ,अखेर दिला ओ तुम्ही मला जन्म पण,रात्रंदिन तुम्हाला माझ्या विचारापायी झोपही तुम्हा लागेना.. मी लहान मूल असो,तरुण असो की म्हातारी तरी दृष्ट नजरा माझी शिकार करायला टपलेल्या दिसतात.. त्यांची शिकार तर मी होणार नाही ना या विवंचनेत तुमची झोपही उडते समजते मला तुमची आतुरता,तळमळ .. पण,तो पुरुष ही एक मायचा तुकडाच असतो तरी असे अघोरी कृत्य कसा करतो?.... त्याची माय,बहिण,...

सहकार भारतीचा स्थापनादिन कल्याण मध्ये साजरा

 (अतुल फडके  - कल्याण) रविवारी १२ जानेवारी रोजी सहकार भारतीचा स्थापना दिन कल्याणच्या अभिनव शाळेत साजरा करण्यात आला ़सहकार भारती ही राष्ट्रीय संस्था असून भारतीय सहकार क्षेत्रात (१९७८)स्थापनेपासून कार्यरत आहे ़संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांनी या संस्थेची स्थापना केली ़११ जानेवारी १९७९ रोजी ही संस्था नोंदणीकृत झाली ़सहकारी सहकारी क्षेत्रांना प्रोत्साहन देणे, त्यांची कार्यक्षमता वाढवणे, सहकारी तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे ,ग्रामीण व शहरी भागातही या चळवळीचा विस्तार करणे ,व सहकारी संस्थांचे संघटन करणे, हे सहकार भारतीचे मुख्य उद्देश आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून या सहकार भारती संस्थेची स्थापना झाली असून "मूल्यांशिवाय सहकार्य नाही सहकार्याशिवाय मोक्ष नाही" असे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे़़ अशी संस्थेबद्दल माहिती एडवोकेट उज्वला पाटील यांनी दिली टेन्शनतरी सहकार भारतीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने १०मान्यवरांना "सहकार भूषण "पुरस्काराने गौरविण्यातत आले ़कल्याण जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनं...

'अशी भरली ग्रामसभा' नाटिकेची जिल्हास्तरावर निवड

श्रीरामपूर (प्रतिनिधी )--  जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित श्रीरामपूर पंचायत समिती तालुकास्तर सांस्कृतिक स्पर्धा अशोकनगर येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या.बालगटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडीच्या विद्यार्थ्यांची 'अशी भरली ग्रामसभा' ही विनोदी आणि प्रबोधनपर ठरणारी नाटिका तालुक्यात पहिली आली.या नाटिकेचे संवादलेखन आणि दिग्दर्शन उपक्रमशील शिक्षक रज्जाक शेख यांनी केले आहे. ही नाटिका जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,विस्तार अधिकारी मंगल गायकवाड, केंद्रप्रमुख  आंबीलवादे, केंद्रसमन्वयक राजेंद्र केदारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक आणि शालेय व्यवस्थापन समिती माळेवाडी, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे आदींनी अभिनंदन केले. ग्रामसुधारक उपक्रमांना आवश्यक आदर्श ग्रामसभेचे सादरीकरण बालकलाकार सोहम वमने,आर्यन बनसोडे, साई उमाप,यश वमने, अमन शहा ,सत्यजित उमाप, श्रीजीत लबडे, कृष्णा खिलारी, ओमकार ताके,गणेश पवार,...

*आभार...*

आभार मानणे' तशी एकदम सोपी गोष्ट पण आपण आभार मानण्यात खुपदा स्वतःचा कमीपणा मानतो आणी जिथे आभार मानायचे तिथेही आभार मानत नाही.. माझ्या मते आपण प्रत्येक क्षणी समोरच्याचे मनापासून आभार मानायची सवय लावून घेतली पाहीजे.. येणारा प्रत्येक क्षण आपल्या आयूष्यात काहीतरी नवीन घेऊन येत असतो.. आपल्याला काहीतरी देऊनच जात असतो, काहीही झाल तरी आभार मानत चला.. चांगल्या गोष्टीत तर मानायला हवेतच, पण अगदी वाईट गोष्ट घडली तरीही आभार मानायला विसरु नका.रस्त्यावरुन जाताना ठेच लागली तर त्या दगडाचे मनापासून आभार माना, कारण तो तुम्हाला नीट लक्षपूर्वक चालायला शिकवतोय. एखाद्या जवळच्या व्यक्तीने धोका दिला, फसवल तर त्याचेही आभार माना, तो तुम्हाला माणसं कशी ओळखायची हे शिकवते. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी चांगल कारण असतच.एखाद्याच्या  नजरेत जरी आपली किंमत शुन्य असली तरी कुणासाठी आपण अनमोल सुध्दा असु शकतो..आपली किंमत आधी आपण स्वतः ओळखण खुप महत्वाच असत.. आणी मग इतरांच्या नजरेत ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावं. अर्थात आपल्या मधील चांगल्या गुणांचा विकास करुनच केवळ हे शक्य आहे, हो ना....! हिरकणी सौ.अनिता ...

कांदिवली मधील आंबेडकर मनपा रुग्णालयातील एम.आय.आर.मशिन नादुरुस्त असल्याने गरिब गरजू रुग्णांची होते गैरसोय

. भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालयातील एम.आय.आर.मशिन अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने गरिब गरजू रुग्णांची गैरसोय होताना दिसते.विरारपासून ते मालाड गोरेगाव पर्यंतच्या गरिब रुग्णांना कांदिवली पश्चिम येथील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालयात अत्यंत अल्प दरात सर्व सुख सोयी युक्त उपचार मिळत असतात.अवघ्या २५०० रुपयांत येथे रुग्णांना एम.आय.आर.काढून दिला जातो.ही रुग्णांच्या बाबतीत खूप चांगली गोष्ट आहे,पण गेल्या अनेक दिवसांपासून एम.आय.आर.मशिन नादुरुस्त असल्याने गरिब गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे.खाजगी एम.आय.आर.सेंटर वर मन मानेल तसे पैसे रुग्णांकडून घेऊन एम.आय.आर.काढला जातो,गरिब गरजू रुग्णांना खाजगी सेंटर वर एम.आय.आर.काढणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने शक्य होत नाही.मनपा आंबेडकर रुग्णालयातील एम.आय.आर.मशिन प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्त करून गरजू गरीब रुग्णांच्या सोयीसाठी उपलब्ध करून द्यावे.जेणे करुन रुग्णांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार नाही.

भिडेवाड्यात हो वाड्यात । मुलींची पहिली शाळा । कसा फुलविला । शिक्षणाचा मळा॥

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल मध्ये, कवी मनोहर पवारांचा काव्य जागर . केळवद जि बुलढाणा येथील सुप्रसिद्ध ग्रामिण  कवी, साहित्यिक, मनोहर पवार यांनीआंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल पुणे येथे काव्य संमेलनात बुलढाणा जिल्हयातून सहभाग नोंदविला . यात सावित्रीमाई फुले जन्मऊत्सवा निमित्ताने जागतिक पातळीचे ६०० कवींनी सहभाग नोंदविलात्यामध्ये, दुबई, केरळ, आध्र, तामिळ, दिल्ली, आणि विविध राज्यातून मराठी आणि सत्यशोधक फुले प्रेमींनी सहभाग नोंदविला . या अभूतपूर्व महासंमेलनाचे आयोजक भिडेवाडा कार, विजय वडवेराव यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले . त्यात सावित्रीमाई फुले फातीमा बी,तसेच लहूजी साळवे, महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर संघर्षावर आधारीत नाट्य, एकपात्री, अभिनय, काव्य वाचन, तसेच, गझल, पोवाडे, कट्टा दांडपट्टा, जुदो कराटे, आदी कलांचे प्रात्याक्षिक करण्यात आले . सहभोजन, आणि  स्नेहमिलन कार्यकम झाला . ८० वर्षांच्या वयस्कर आजीपासून ते १५ वर्षांच्या मुली पर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला . सर्वांना भारताचे संविधान व स्मृती चिन्ह तसेच आकर्षक समान चिन्ह प्रदान करण्यात आले .एस. ए म. जोशी सभागृहात ...

*निस्वार्थी लढायाचं यशस्वी होतात ....*

    *शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध,जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही*,हे प्रसिद्ध वाक्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी यांचे आहे.ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले ते नक्कीच चांगला बदल घडवितात.अन्यायाविरुद्ध पेटून उठतात,ते पण निस्वार्थीपणे.कधीच स्वतःचा उदो उदो घडावा असा त्यांचा हेतू नसतो.आपल्या इतिहासात भरपूर व्यक्तिमत्त्व घडून गेले,ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि त्यामुळेच दूरदृष्टीने कार्य त्यांनी त्याही काळात केले.*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर* यांची यावर्षी आपण *त्रिशताब्दी जयंती* साजरी करतो.त्यांना त्या काळात त्यांच्या वडिलांनी व सासऱ्यांनी शिकविले.. त्यामुळेच तर त्या वैचारिक दृष्ट्या सक्षम झाल्या आणि राज्यकारभार सांभाळू शकल्यात ते ही माणुसकीने,निस्वार्थी भावनेने कार्य केले..कोणताही जातीभेद,स्री-पुरुष,गरीब-श्रीमंत असा भेद न करता त्यांनी सामाजिक कार्य केले ते ही स्वतः च्या मालकीच्या( खाजगी) पैशातून....राज्यकारभाराचा( सरकारी तिजोरीतील) कोणताही पैसा या कामी त्यांनी खर्च केला नाही.        त्यांच्या आधीही भरपूर महिला शिक्षित होत्या.त्यांच्या...