Skip to main content

Posts

*।। जय शिवराय ।।*यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्या छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे.

  *।। जय शिवराय ।।* यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्या छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे.... आणि हाच इतिहास प्रत्येकाच्या मनात टिकून राहावा म्हणून, प्रसिद्ध चित्रकार श्रीयुत हरीश पाटील गेले एक वर्ष एका प्रकल्पावर अथक मेहनत करत होते ते म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याचे पेंटिंग! गेले चार महिने सतत दिवस रात्र काम केल्यानंतर, ते पेंटिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. त्यांच्या या मनोभावे केलेल्या कार्याची दखल घेण्यासाठी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब  त्याच बरोबर अनेक मान्यवर सुद्धा तिथे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय जयकुमार रावलजी , आमदार माननीय मनीषाताई चौधरी यांचीही उपस्थिती होती. तसेच हे पेंटिंग त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना भेट म्हणून प्रदान केले.  जय शिवराय...जय शंभु...!! छत्रपती शिवाजी राज्याभिषेक सोहळा (Canvas and acrylic print) पेंटिंग विविध size मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 📞+91 98691 33442 Name: Harish pa...

श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे विकासक आनंद मोदी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी विकासक आनंद मोदी जी यांना श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.विकासक आनंद मोदीजी एक कुशल , रहिवाशांच्या समस्यांची जाण असलेले, घराच्या बदली घर देण्याच्या उद्देशाने एस.आर.ए.योजना श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विभागात राबवित आहेत.रहिवाशांमध्ये मिसळणारे विकासक विभागात लोकप्रिय आहेत.एस.आर.ए.मध्ये येणाऱ्या समस्या विना विलंब सोडविणे, पात्रता, विकास कामांसाठी जागा खाली करणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत.विभागातील लोक प्रिय विकासक आनंद मोदीजी यांना कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,( १७ फेब्रुवारी २०२५) शुभेच्छुक.. अध्यक्ष/ मुख्य प्रवर्तक.. विजय पाल, महासचिव.. भारत कवितके, उपाध्यक्ष..ग्दिविजय पाठक, खजिनदार..दिवानसिंह सौन,उप सचिव.. संजय कुंभार,  उपखजीनदार.. प्रेम शंकर सागर वर्मा..व सभासद, सदस्य, आणि रहिवासी बांधव.

मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्यसमूह महाराष्ट्र या समूहाचे तिसरे साहित्य संमेलन दिनांक ९/०२/२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 हे साहित्य संमेलन प्रसिद्ध कवी/ व्याख्याते/ निवेदन मा. गजानन उफाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपशिक्षणाधिकारी मा.निता श्रीश्रीमाळ, विस्तार अधिकारी मा. विद्या दीक्षित, विशेष अतिथी म्हणून केंद्रप्रमुख मा.अनिल साखरे ,ज्येष्ठ कवी डॉ. शिवा प्रधान व मा .दत्तात्रय भोसले, प्रमुख अतिथी म्हणून मा.भालगडे सर उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात स समूहाच्या संस्थापिका अल्का धोंडणे- साखरे  यांनी समूहाचा आलेख वाचून दाखवला. दीपोत्सव मैत्रीचा या दिवाळी अंकाचे प्रकाशन व साहित्य क्षेत्रात आपल्या कार्यातून कवितेतून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कवियत्री यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्घाटक नीता श्री श्रीमाळ व विद्या दीक्षित यांनी  यावेळी कार्यक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या. डी. आर. बांगर सरांचे बदल या विषयावरचे कथाकथन प्रभावी ठरले. शिवा प्रधान यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ व आजचा युवक यावरील परिसंवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भोजन कालावधीत सुगम संगीतां...

धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी आंदोलनाची धार बोथट होऊ देऊ नका ".. पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूकीपूर्वीची धनगर समाज एसटी आरक्षण अमंलबजावणी ची मागणी तीव्रतेने महाराष्ट्र राज्य भर जाणवत होती.मागणीची धार आता निवडणुकीनंतर बोथट होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे.ही धार समाज बांधवांनी बोथट होऊ देऊ नये. असे आवाहन धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी आवाहन केले आहे.पुढे एका मुलाखतीत भारत कवितके म्हणाले," पूर्वी आपला समाज विखुरलेल्या अवस्थेत, शिक्षणापासून दूर, अशिक्षित होता, त्यामुळे आपल्या अस्तित्वाची त्यांना जाणीव झाली नसेल हे कारण सांगून आपले पूर्वज यातून सुटले असले तरी येणारी आपली पिढी मात्र आपणाला माफ करु शकणार नाही.कारण आता समाज चांगलाच जागृत झाला असून शिक्षणाने,विचाराने खूप पुढे गेला आहे.आपल्या आस्तित्वाची त्यास पूर्ण जाणीव झाली आहे.संविधान समाविष्ट आपली मागणी योग्य असून ही आपल्या समाजाला आतापर्यंतच्या राज्यकर्ते यांनी एसटी आरक्षण अमंलबजावणी पासून दूर ठेवले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यातील सुशिक्षित तरुण बांधवांनी पुणे येथे अधिवेशन...

समाज परिवर्तनाचे विचार साहित्य आणि कलेतून लोकांपर्यंत घेऊन जावे – कवी.विनोद अष्टुळ

समाज परिवर्तनाचे विचार साहित्य आणि कलेतून लोकांपर्यंत घेऊन जावे – कवी.विनोद अष्टुळ  महामानवांनी केलेले कष्ट, त्याग आणि दिलेले परिवर्तनवादी विचार साहित्यातून समाजापर्यंत पोहोचण्यासाठी कवींनी आणि गायकांनी सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध उपक्रमांतून आपल्या कविता आणि गीतातून समाजाला प्रबोधन करणे आवश्यक आहे. असे अध्यक्षीय भाषणात कवी विनोद अष्टुळ यांनी आपले मत व्यक्त केले.  महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आयोजित महामाता रमाई महोत्सव २०२५ मध्ये रमाईच्या लेकरांचे कवीसंमेलन वाडिया कॉलेज समोर पुणे येथे संपन्न झाले.  हे साहित्य सम्राटचे १९९ वे कवी संमेलन होते. त्यावेळी अष्टुळ बोलत होते.  विचारपीठावर स्वागताध्यक्षा मा. लताताई राजगुरू, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, विशेष अतिथी मा.रवींद्रअण्णा माळवदकर, ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब सोनवणे, तुकाराम डावरे रा.अध्यक्ष केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग भारत सरकार नवी दिल्ली, संमेलन अध्यक्ष विनोद अष्टुळ,  आणि मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.  कवी आणि संम...

*समीक्षण*. काव्य संग्रह:- कव्यमालाकवी:- धनजंय इंगळेपृष्ठ:- ६४किंमत:- ११० रुपयेप्रकाशन:- वारकरी प्रकाशनमुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारीप्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५

काव्य संग्रह:- कव्यमाला कवी:- धनजंय इंगळे पृष्ठ:- ६४ किंमत:- ११० रुपये प्रकाशन:- वारकरी प्रकाशन मुखपृष्ठ चित्रकार:- श्री.अनिल रंगारी प्रथम आवृत्ती:- जानेवारी२०२५           हातात पुस्तक पडताच त्याचा सुगंध मनाला मोहवून गेला.काव्याच्या एका एका पुष्पाने ही काव्यमाला अलगद शब्द रूपाने गुंफली गेली.शब्दमोती किती अनमोल असतात हे आपणास ठावूक आहेच.सोन्यापेक्षा ही याचे मोल अनमोल आहे.काव्यसंग्रहाच्या अंतरंगात एकूण ५२ कविता व मल पृष्ठावर एक अशा एकूण ५३ कविता या काव्यसंग्रहात आहेत.प्रत्येक काव्याचा ढंग हा आगळा वेगळा आहे.         काव्य संग्रहाला संपादक,गीतकार,साहित्यिक गुलाबराजा फुलमाळी यांची प्रस्तावना लाभलेली आहे.सुवर्ण अनुभवांची गुंफण म्हणजेच काव्यमाला..असा सुरुवातीलाच त्यांनी उल्लेख केला.भवनाचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य असते असे माझे तरी म्हणणे आहे.एखादी भावना मनात उत्पन्न झाली की,ती काव्याच्या रूपाने अलगद प्रसूत होते...एक एक मोती अचूक हेरला आणि त्याला गुंफले जाते,तेव्हा आपलेच अपत्य आपल्याला कुरवळतांना किती आनंद होतो.स्व निर्मिती मनाला नवीन ऊर्जा देवून ...