Skip to main content

Posts

विचार हवा व्हायला

             आज जिकडे तिकडे स्पर्धा चालू आहे असे जाणवते म्हणजे १०१% ती चालूच आहे.पण,एकमेकांशी स्पर्धा करून काय साध्य करणार आहोत आपण?तोडा, फोडा आणि राज्य करा,अशी सगळीकडे परिस्थिती झालेली आहे.जी अवनिती/कुनिती इंग्रजांनी वापरली राज्य करण्यासाठी तीच अवनिती/ कूनिती आपण वापरतो,या जीवन वाटचाली का? आणि कशासाठी? हा ही मोठा यक्ष प्रश्न आहे?हे चित्र लवकरच बदलले पाहिजे.या पुढील चित्र तर फारच भयाण असणार आहे,तेव्हा यावर आताच विचार व्हायला हवा आणि त्यातून उपाय योजना ही.हे साहित्याच्या नावाखाली चालणारे बाजार थांबविले पाहिजे.आपल्या आपल्यात वाद लावून द्यायचे आणि त्यांनी स्वतःचा फायदा  करून घ्यायचा.दोन मांजरी आणि एका माकडाची गोष्ट ही आपणा सर्वांना परिचित आहेच.तीच अवस्था आपली आपणच करून घेतली आहे.         आपण स्वतःस साहित्यिक म्हणवितो आणि आपणच एकमेकांना किंमत,मान सन्मान देत नसेल तर काय उपयोग? कोणत्या तोंडाने स्वतःस साहित्यिक म्हणवून घेतो?आपल्या लेखणीचा आणि माणूस या पात्राशी काही संबंध उरतो का?एकीकडे मोठ्या रुबाबात म्हणायचे आम्ही व्यवसाय...

*नीलपुष्प काव्यसंध्या आणि गझल कार्यशाळा एक आनंददायी सोहळा*

........................................ ठाणे: रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ एकीकडे आज रामनवमीचा उत्सव सुरू असतानाच नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकुल प्रांगणात सांगलीचे सुप्रसिद्ध गझलकार सिराजभाई शिकलगार यांची गझल मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.  सुरुवातीलाच पाहुण्याच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. आणि निवेदिका निलम शेलटे यांनी सुप्रसिद्ध गझलकार सिराजभाई शिकलगार यांचा सुंदर असा परिचय करून दिला.  त्यानंतर राजेश साबळे ओतूरकर अध्यक्ष नीलपुष्प आणि प्रा. नागेश हुलवळे संस्थापक वर्ल्ड व्हिजन यांनी दोन्ही संस्था तसेच सौ सावित्री ताई झांबरे आणि तानाजीराव झांबरे यांच्या तर्फे सिराज शिकलगार सरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर गझलकार सिराजभाई यांनी आपल्या ओघवत्या भाषेत अतिशय छान असा काव्य, कथा, लेख, साहित्य आणि गझल या एकाच आहेत. त्यात कोणीही डावे उजवे करू नये. असे आणि समजण्याचे कारण नाही. कारण चांगले काव्य करता आले तरच चांगली गझल लिहिली जाते.  गझल हा कवितेचच प्रकार आहे. कोणी ही गझ...

खाजगी रुग्णालयावर व औषधांच्या कंपन्या वर शासनाचे नियंत्रण असायला हवे.. साहित्यिक भारत कवितके यांचे मत.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. महाराष्ट्र राज्यातील खाजगी रुग्णालयावर व औषधांच्या कंपन्या वर शासनाचे नियंत्रण असायला हवे, असे मत मुंबई कांदिवली येथील साहित्यिक भारत कवितके यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.भारत कवितके पुढे म्हणाले," नुकतीच पुणे येथील मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या असंवेदनशील घटनेने एका महिलेला दोन मुलींना अनाथ करून जीव गमवावा लागला,पुरा महाराष्ट्र हळहळला, डॉक्टरांनी आपला पेशा धर्म समजून करावा, डॉक्टर होण्यासाठी शैक्षणिक बाबतीत खूप आर्थिक बोजा सहन करुन डॉक्टर होतात,हे जरी मान्य असेल तरी डॉक्टरांनी रुग्णांचे आर्थिक शोषण करु नये असे प्रामाणिकपणे वाटते, काही काही वेळा रुग्णांना दाखल केल्यानंतर दोन तीन दिवसांनी डिस्चार्ज देताना जे बील होते ते पाहून रुग्णांचा व नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकतो, आयुष्य भराची जमा केलेली पुंजी एका झटक्यात संपून जाते.भविष्याची चिंता सतावत राहते, प्रत्येक खाजगी रुग्णालयात आर्थिक बाबींचा नोटीस फलकावर लावण्यात यावा, रुग्णालयीन वस्तूंच्या किंमतीची नोंद करण्यात यावी.उदा.बेड चार्ज, तपासणी फी,एक्सरे फी, रक्त तपासणी फी, सीटी स्कॅन, औषध ग...

*प्रत्येक विभागीय महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवनाची निर्मिती*

नवी मुंबई प्रतिनिधी:- सुचित्रा कुंचमवार ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था ही संस्था अखिल भारतीय जेष्ठ नागरिक कॉन्फरन्स व महाराष्ट्र  ज्येष्ठ नागरिक फेडरेशन व नेरूळ ज्येष्ठ नागरिक संस्था या संस्थांची शिखर संघटना आहे. या संस्थेची बैठक दिनांक 29/3/2025 रोजी संपन्न झाली. या बैठकीत सन 2025 - 26 या वर्षातील उद्दिष्टांवर चर्चा करतांना संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एन. चापके यांनी विभागीय मुख्यालयाच्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवनाची निर्मिती करण्यात यावी असे  आवाहन केले. यासाठी त्या  क्षेत्रातील  सर्व ज्येष्ठ नागरिक संघानी, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींकडून सहकार्य घ्यावे तसेच सी.एस.आर.व दानशूरांकडून  देणगीव्दारे हा प्रकल्प साकार करावा असे मत मांडले .असे प्रकल्प साकार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था उचित मार्गदर्शन करेल असेही आश्वासन दिले. या बैठकीला श्री.पांडुरंग क्षेत्रमाडे खजिनदार, श्री. प्रभाकर गुमास्ते सहसचिव , डॉ. अण्णासाहेब टेकाळे सदस्य, श्री. अरविंद वाळवेकर, सदस्य, श्री अंकुश जांभळे सदस्य, श्री. चंद्रकांत महामुन...

पुस्तक समीक्षणपुस्तकाचे नाव:- मी अहिल्या आहे(ऐतिहासिक कादंबरी)लेखिका:- रंजना फतेपुरकर( मै अहिल्या हूं)अनुवादक:- डॉ.एन.जी.काळे( हिंदी भाषेतून मराठीत अनुवाद)प्रकाशक:- श्री.सर्वोत्तम प्रकाशन,इंदोरमूल्य::-२०० रुपये एकूण पृष्ठ:- १०४समीक्षक:- सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण,पुणे ४४

पुस्तक समीक्षण पुस्तकाचे नाव:- मी अहिल्या आहे (ऐतिहासिक कादंबरी) लेखिका:- रंजना फतेपुरकर( मै अहिल्या हूं) अनुवादक:- डॉ.एन.जी.काळे( हिंदी भाषेतून मराठीत अनुवाद) प्रकाशक:- श्री.सर्वोत्तम प्रकाशन,इंदोर मूल्य::-२०० रुपये  एकूण पृष्ठ:- १०४ समीक्षक:- सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण,पुणे ४४ पुस्तक म्हणजे आत्मा असतो.त्यात ऐतिहासिक कादंबरी जीव की प्राण.त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित रंजना फतेपुरकर मॅडम यांनी लिहिलेली ही कादंबरी मूळ हिंदी भाषेतील आहे,मैं अहिल्या हूं.त्याचे अनुवादक डॉ.एन.जी.काळे सर आहेत.         या पुस्तकाला श्रीमंत यशवंतराव होळकर सर,डॉ.सुधीर तांबे सर,घनश्याम होळकर सरांच्या ही शुभेच्छा लाभलेल्या आहेत.तसेच या पुस्तकाची डॉ.देवेंद्र जोशी सरांनी समीक्षा केलेली आहे.रंजना मॅडम यांचे सुंदर असे मनोगत अन् आभार.तसेच रंजना मॅडम यांनी हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी अर्पण केलेले आहे.           पुस्तकाची भाषा ओघवती आहे.सर्व सामान्य व्यक्तींना ही भाषा समजेल त्यामु...

रणजित पवार लिखित ममता पहिलवान या पुस्तकासराज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ओतूर - राष्ट्र सेवा परिषद आणि मराठबोली संस्था ,पुणे यांच्या वतीने, दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना व विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केल्या जाते. यावेळेस श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ओतूर येथील कवी,लेखक रणजित पवार लिखित व लेण्यांद्री प्रकाशनाने प्रकाशित केलेले, देशातील पहिली महिला कुस्तीपटू ममता पहिलवान या पुस्तकास ' राज्यस्तरीय प्रभुरत्नाई साहित्य गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.      १०० वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील पाटोळे या गावची महिला ममता पहिलवान यांनी कुस्तीक्षेत्रात फार मोठे नाव कमावले होते. त्याकाळात पुरुषासंगे संपूर्ण कपडे काढून फक्त लंगोट घालून आखाड्यात उतरत असे.त्यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढ्या कुस्त्या खेळल्या तेवढया संपूर्ण जिंकल्या.त्यांची परिसरामध्ये 'ममत्या पहिलवान ' म्हणून आजही ओळख आहे. त्यांचे जीवनचरित्र म्हणजे आजच्या तरुणांसाठी,खास करून मुली व महिलावर्गासाठी एक आदर्श आहे.प्रेरणा देणारे आहे.कारण ज्या काळात महिलांवर अनेक बंधने होती.त्याकाळात पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीखेळामध्ये ममता पहिलवान पुरुष बनून नि...

रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा... संभाजी राजे छत्रपती यांची मागणी तर महाराष्ट्रातील धनगर समाज यास तीव्र विरोध करेल.. बाळासाहेब दौडतले.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या मागणीसाठी संभाजी राजे छत्रपती यांच्या या मागणीला महाराष्ट्रातील धनगर समाज तीव्र विरोध करेल असे बीड मधील धनगर समाजाचे बाळासाहेब दौडतले यांनी जाहीर केले, यावरून महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरण अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ में २०२५ पूर्वी हटविण्यात यावी, वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठे ही संदर्भ, उल्लेख आढळत नसल्याने आणि भारतीय पुरातत्व विभागाने देखील वाघ्या बाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक काळ संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते,१०० वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी केलेली असून त्यावर मात्र बीड मधील धनगर समाज बांधव तीव्र आक्रमक झालेला असल्याने महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत, धनगर समाजाला व...