वार्ताहर (श्रीरामपुर):: जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी शाळेत नुकताच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला . चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धामधील यशाबद्दल विद्यार्थ्यांचा शाळेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीरामपूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी राणी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना घ्यावयाची काळजी याबद्दलचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावतो असे त्यांनी गौरवोद्गार काढले. शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संस्कार स्पर्धापरीक्षा मुंबई तसेच साई कलाविष्कार संस्था पुणे यांच्या चित्ररंगभरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,मेडल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता य...