पावसाचा लपंडाव खेळ खेळती सरी , सोन पिवळे ऊन लकाके सर्व दूरवरी. ॥१॥ पहिला वहिला सण श्रावणातला लय भारी , अशा उत्सवाची झुंबड घेऊनी येई श्रावण खरोखरी.॥२॥ बळीराजा हा असे कैवारी , नाग राजाची मूर्ती पुजुया मनोभावे घरोघरी .॥३॥ रुसला पर्जन्य राजा मदत ना मिळे कोणाची, परी नागराजा तुच खरा सखा पाठ राखतो बळी राजाची.॥४॥ रक्षण करूया नाग राजाचे, जतन करूया अपुल्या निसर्गाचे. ॥५॥ कालीया नागास केले चारी मुंड्या चित, यमुना नदीपात्रातुनी श्रीकृष्ण वर आले सुरक्षित.॥६॥ श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर सहाय्यक शिक्षक मोहिते पाटील विद्यालय , मानखुर्द मुंबई- ४०००४३. भ्रमण ध्वनी क्र.८१०८४६९६३५