Skip to main content

Posts

*डॉ खंडू माळवे(खं र माळवे -खरमा)यांना जीवनगौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्राप्त*

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते खंडू माळवे उर्फ डॉ खं र माळवे -खरमा यांना या अगोदर सलग चौथ्यांदा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे याही वर्षी जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दैनिक प्रहार संपादक सुकृत खांडेकर यांचेहस्ते नुकताच देण्यात आला.ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा पश्चिम येथे देण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भुषविले उदघाटक मां प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार डॉ खं र माळवे -खरमा यांचेहस्ते करण्यात आले स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन टाईम्सचे अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे यांनी आपल्या संविधानाच्या उदेशिकेचे वाचन केले यावेळी रविवार दि २५/०८/२४रोजी प्रमुख पाहुणे म्हणून नासा शास्त्रज्ञ डॉ डेरिक एंजल्स पद्मश्री डॉ जी.डी.यादव(अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार दै प्रहार संपादक सुकृत खांडेकर बी.पी.ई.हायस्कुल बांद्रा मुख्याध्यापक भानुदास केसरे नॅशनल लायब्ररीचे सचिव प्रमोद महाडक, उद्योजक राजे...

सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत "राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित..."सन्मान एका कार्यकुशल, हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा"

              पेण तालुक्यातील खारपाडा गावातील एक नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक, राज्यस्तरीय व्यसनमुक्तीदुत,  सामाजिक कार्यकर्ते, युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन (एनजीओ ) संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि उत्कृष्ठ पत्रकारिता कार्याचा सन्मान जन राष्ट्रीय रेल्वे शू शाईन कामगार युनियन प्रणित जन राष्ट्रीय कर्मचारी युनियन र.न.ए.एम कार्यासान १७/११३०३ यांचे वतीने शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता कस्तुरबा हॉल सेनापती बापट रोड माटुंगा पश्चिम रेल्वे स्टेशन समोर मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय धर्मगुरू अरुणानंद महाराज (मॉरिशस), विश्वगुरू नामदेव महाराज हरल यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक दिपक कालिंगण , कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत दादा राणे (अध्यक्ष धडक कामगार युनियन), नंदकिशोर खानविलकर (अध्यक्ष जनरल एम्...

ग्रेट भेट - रानकवी 'तुकाराम धांडे' मराठी बालभारती पुस्तकातील कवी यांची

        मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ आज आम्ही तिघे मित्र (विजय पिलकर जयराम पारधी आणि मी संतोष जाधव) सुप्रसिद्ध रानकवी *तुकाराम धांडे* सरांना भेटण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी 'शेंडी' येथे गेलो. अहमदनगर जिल्ह्यातील हा परीसर निसर्गरम्य स्थळांनी प्रसिद्ध आहे.प्रसिध्द कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा,भंडारदरा धरण,रंधा धबधबा, रतनगड,अलंगगड,मलंगगड,कुलंगगड अशा अल्हाददायक ठिकाणी शेंडी गावात धांडे सरांचं एक बंगलावजा घर आहे.या घरात धांडे सरांनी एक खोली सुरक्षित राखून ठेवली आहे.या खोलीला नाव दिलं आहे 'आईचं घर'  या खोलीत त्यांच्या आईच्या साऱ्या आठवणी आहेत.या खोलीत त्यांनी लादी बसवलेली नाही.भिंतीला प्लास्टर केलेलं नाही.मस्त शेणाचं सारवण असलेल्या या खोलीत दगडाचं जातं आहे,दगडाचा पाटा वरवंटा आहे.मातीची काही भांडी आहेत.वेगवेगळ्या बरण्यांमध्ये शेतात येणारे वेगवेगळी कडधान्य व वेगवेगळ्या तांदळाचे प्रकार आहेत.दोन तीन प्रकारच्या भाकरीचं  पिठ करुन ठेवलं आहे.काही बरण्यांमध्ये समुद्रात मिळणारी सुकी मच्छी बोंबील- सुकट असून एका बरणीत आई बनवायची तसं घरगुती पद्धतीचे लोणचं...

*जातिनिहाय जनगणना परिषद : सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मुंबई कौन्सील) तर्फे ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, मुंबई येथे जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. परिषदेसाठी प्रमुख वक्ते सुरेश सावंत हे प्रसिद्ध राजकीय व सामाजिक अभ्यासक मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे असणार आहेत. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक आरक्षणात त्यांचा योग्य वाटा मिळावा यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे. पक्षाचा असा विश्वास आहे की हा डेटा विविध समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि संसाधनांचे प्रभावीपणे वाटप करण्यासाठी आवश्यक आहे. ही मागणी जनतेपर्यंत नेण्यासाठी आणि जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी ही परिषद मोठ्या जनआंदोलनाचा भाग आहे.  भारतीय...

बोरीवली मध्ये ३१ आगस्ट विमुक्त दिनाचे आयोजन.भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम

शनिवार दिनांक ३१ आगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बोरीवली येथील राजर्षी शाहू महाराज संस्कार केंद्र,स्व.शैलजाताई विजय गिरकर समरसता सभागृह, फुलपाखरू उद्यान, बोरीवली पूर्व या ठिकाणी विमूक्त घुमंतू जनजाती विकास परिषद ( अ.भा.)यांचे वतीने विमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.३१ आगस्ट विमुक्त दिन साजरा करण्यात येणार आहे या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ.निहारिका खोंदले सचीव भाजपा मुंबई,व अध्यक्षा धनगर समाज एकता मंडळ, बबनराव मोहिते उपाध्यक्ष भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र, प्रमुख उपस्थिती भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम साहित्यिक व पत्रकार,लहू पवार सदस्य, मी वडार महाराष्ट्राचा,सौ.अर्चना लष्कर महिला अध्यक्षा मी वडार महाराष्ट्राचा, आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या विमुक्त दिनाचे निमंत्रक सहदेव रसाळ अध्यक्ष मुंबई गिरीधर साळुंखे कार्यवाह मुंबई, महादेव रसाळ, मंगेश शिंगे,धृपद रवंदळे,उमेश जोशी, अशोक वाडेकर,मोहन अलकुंटे, संदेश रसाळ, गंगाराम क्षिरसागर,सुजीत गोसावी आदी विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद चे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.

नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार - २०२४ सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

 प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने मुंबई वांद्रा पश्चिम येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता  विविध क्षेत्रतील मानवरांना  प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी बाळासाहेब तोरस्कर यांनी भूषवले ' उद्घाटक  साहित्यिक आणि उपाध्यक्ष सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य  डॉ. खं . रं . माळवे खरमा . मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आले . बी. पी . ई . हायस्कूल बान्द्रा या मुलींनी स्वागत गीत सादर केले .  स्वागताध्यक्ष आणि  कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे मुंबई यांनी आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देशिका वाचन केले आणि  त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले .  आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉ डी .जी  यादव डॉ डेरिक एंजल्स ' डॉ सुकृत खांडेकर ' श्री भानुदास केसरे ' प्रमोद महाडीक ' रामकृष्ण कोळवणकर ' राजीव कांबळे , डॉ गॅन्सी अल्बुकर्क आदि मान्यवर उपस्थितीत ...

*स्व परिचय*

 *1)पूर्ण नाव:*  *श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसे*   *2) सध्या राहत असलेला पत्ता:-* *मोरेश्वर कॉम्प्लेक्स, D-403, सेक्टर-* *18, कामोठे, नवी मुंबई ,*   *तालुका: पनवेल,*   *जिल्हा:रायगड.*  *3) मूळ गाव.*      *मुक्काम पोस्ट:  पाडळी दर्या,*       *तालुका: पारनेर*       *जिल्हा: अहमदनगर*  *4)शिक्षण*: *DSM,BABED.*   *5)वय : 56*  *6)पद*: *सहाय्यक शिक्षक*  *7) शाळा ,नाव, पत्ता*:        *मोहिते पाटील विद्यालय,*          *वीर तानाजी भोसले मार्ग*          *पनवेल घाटकोपर लिंक रोड,*           *मोहिते पाटील नगर,*            *मानखुर्द, मुंबई- ४०००४३*  *8) नोकरी करत असाल तर,एकूण नोकरी.*: *२६*  *9) शासनाकडून / किंवा इतर फाउंडेशनकडून मिळालेले पुरस्कार नावे..*  *इतर फाऊंडेशन/ सामाजिक संस्थे* *कडून मिळालेले पुरस्कार* *संख्या - २१...