Skip to main content

Posts

गझलकार शिराज शिकलगार यांनी वयाच्या ६७ व्या वर्षा एम . ए . पदव्युतर पदवी मिळवली

कवि सरकार इंगळी आंधळी .ता.पलूस.जि.सांगली येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक व गझलकार सिराज करीम शिकलगार यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी मराठी विषय घेऊन एम.ए. ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. सहकार क्षेत्रात ४० वर्षे नोकरी करून वयाच्या ६० व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. कविता व गझल क्षेत्रात त्यांची आतापर्यंत ३८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते मुळचे डबल ग्रॅज्युयट ( बी.ए. व बी.कॉम.) असून आता त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून (महावीर कॉलेज, कोल्हापूर ) मराठी विषय घेऊन एम.ए. ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली आहे.

*गणपती बाप्पा मोरया*

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची या ओळी ऐकल्या म्हणजे आपोआप बाप्पा मोरयाची साजिरी सुंदर मूर्ती डोळ्यासमोर येते. अशावेळी मनाला होणारा आनंद हा शब्दात व्यक्त करणे कठीण. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी व्रताच्या निमित्ताने बाप्पाच्या दर्शनाने मन प्रफुल्लित, प्रसन्न होणे म्हणजे काय असतं ते स्वतः अनुभवणे गरजेचे असते. प्रत्येकाला आपापल्या घरी विराजमान होणाऱ्या बाप्पा मोरयाविषयी वाटणारी ओढ, जिव्हाळा अगदीं अवर्णनीय.  ६४ कला आणि १४ विद्या यांचा अधिपती असलेल्या लाडक्या बाप्पाच्या स्मरणाने भक्तांच्या मनाला एक विशेष ऊर्जा आपोआप प्राप्त होते. शिव पार्वतीचा लाडका सुपुत्र गणपती बाप्पा लहान थोर सर्वानाच आवडतो. लाल रंगाची जास्वंद फुले, हिरव्यागार दुर्वा आणि चविष्ट असे उकडीचे मोदक असा असतो बाप्पाच्या पूजेचा थाट. प्रत्येक नवीन कार्याच्या शुभारंभाला प्रथम पूजेचा मान श्री गणेशाला दिला जातो. शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन पुढचे सर्व काही मंगलकारक व्हावें, हा त्यामागचा हेतू असतो. श्री गणेश ही देवता बुध्दीची, सिद्धीची असल्यामुळे अभ्यासात देखील गणरायाचे साह्य मिळावे यासाठी विद्यार्थी मनोमन मोरयाच...

धनगर समाजातील प्रसार माध्यमांनी पंढरपूर मधील राज्य व्यापी आमरण उपोषणाचा प्रसार व प्रचार करावा.... भारत कवितके यांचे आवाहन.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. धनगर समाजातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियानी धनगर समाजाच्या पंढरपूर मधील शेकडो धनगर समाज बांधवांच्या राज्य व्यापी आमरण उपोषणाचा प्रसार व प्रचार करावा असे आवाहन मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी केले आहे.संविधानात धनगर समाजाचे एसटी आरक्षण समाविष्ट असताना देखील आज वर सत्तेवर असलेल्या जवळ जवळ सर्वच पक्षांनी दुर्लक्ष केले.पण आता मात्र एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाज पुन्हा एकवटला आहे.9 सप्टेंबर सोमवार पासून सामूहिक पणे शेकडो धनगर समाज बांधव (मल्हार यौध्दे) राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसणार आहेत.धनगर समाजातील प्रसार माध्यमांनी मात्र या बाबतीत पाहिजे तेवढा प्रसार व प्रचार केलेला दिसून येत नाही.समाजाच्या प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियावर संपादक, पत्रकार, प्रतिनिधी कार्यरत आहेत.परंतु पंढरपूर येथील राज्य व्यापी आमरण उपोषणाच्या बातम्या पाहिजे तेवढ्या प्रसिद्ध झाल्या नसल्याने महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधव या बाबतीत अजूनही जागृत नाही.या उपोषण आंदोलनाची कल...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री मनोज महाजन सर आय इ एस नवी मुंबई हायस्कूल वाशी यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक सवर्गातून आय इ एस नवी मुंबई हायस्कूल वाशी चे उपक्रमशील, तंत्रस्नेही, इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक, NEP वर आधारित क्षमता वृद्धी प्रशिक्षण ठाणे जिल्हा तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी बजावली होती असे अष्टपैलू शिक्षक श्री मनोज महाजन यांना हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळाला मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातीत टाटा सेंटरमध्ये हा सोहळा ५ सप्टेंबर 2024 रोजी पार पडला  सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, , शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब, मा. श्रीमती आय.ए.कुंदन प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, मा. शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरे साहेब , उपस्थितीत होते मनोज महाजन सर यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श...

मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द शाळेतील श्री चंद्रकांत खोसे 'आदर्श शिक्षक ' पुरस्काराने सन्मानित

  श्री. चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर गेली  गेली २६ वर्षे पनवेल घाटकोपर लिंक रोड हायवेला असलेल्या मोहिते पाटील विद्यालय, मानखुर्द झोपडपट्टी विभागात असलेल्या माध्यमिक विभागात सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत.ते कवी व कथालेखक  ही आहेत त्यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटविला आहे. त्यांना आजतागायत २१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे व  काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी १००० प्रमाणपत्र ही प्राप्त केली आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन  दिनांक ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२४ रोजी  ऑनलाईन "आदर्श शिक्षक " पुरस्कारांच्या निवडीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते व त्यात महाराष्ट्रातून अनेक पुरस्कारांतून  १२ शिक्षकांची " आदर्श शिक्षक " पुरस्कारासाठी निवड झाली त्यात श्री  चंद्रकांत खोसे सर यांचेही नाव झळकले व भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच (रजि ) उत्तर महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते ५ सप्टेंबर २०२४ रोजी ऑनलाईन "आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष: श्री. मा.विशाल मिसा...

पंढरपूर मध्ये धनगर बांधवांचे एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता राज्य व्यापी आमरण उपोषण.

मुंबई प्रतिनिधी - भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता शेकडो धनगर समाजातील बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसणार आहेत.डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला संविधानामध्ये एसटी आरक्षण दिलेले असून ही गेल्या 75 वर्षांपासून धनगर समाज एसटी आरक्षणापासून वंचित आहे.काही बोटावर मोजणारे नेते प्रत्येक पक्षाच्या सोबत जाऊन त्या पक्षाने अख्खी धनगर जमात वेठीस धरली आहे.आतापर्यंत जमातीला हाताशी धरून नेते मोठे झाले आहेत.पण आता जमात मोठी आहे समजून संघटित पणे आंदोलन करुन सरकारला परिपत्रक काढायला भाग पाडू.या उद्देशाने सकल धनगर जमातीतील सुशिक्षित तरुण, सामाजिक कार्यकर्ता, आणि उपोषण करणारे यांनी ना पक्ष ना नेता, जुनेच काम नव्या दमाने करायचे ठरवून एकत्र येऊन पंढरपूर मध्ये 9 सप्टेंबर रोजी शेकडो धनगर समाज बांधव राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसणार आहेत.सोडा मतभेद सोडा विचार भेद , एकदा समाजासाठी संघटित होऊ या ,अभि नहीं तो कभी नहीं,असे आवाहन सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे. भारत कवितके मुंबई...

लेखन :- वास्तविकतेचे ज्ञान देणारे शिक्षक (शिक्षक दिन)

शिक्षक हे असे मार्गदर्शक... जे ज्ञानदक्षिणा जरी घेत असले... तरी मुलांना ज्ञान शिदोरी तळमळतेने देत असतात.         आमचे शिक्षक पहिल्या दिवसापासून सांगायचे, मुलांनो महाविद्यालयात आलात म्हणजे अभ्यास संपला,अन् मज्जा,मस्ती ,फिरणे,मनाला येईल तसे वागणे नव्हे.महाविद्यालयात प्रवेश केलात म्हणजे तुम्ही मोठे झालात.जबाबदार झालात. महाविद्यालयीन ज्ञान तुम्हाला खऱ्या जीवनात जगताना,स्वबळावर उभे राहताना उपयोगी पडणार आहे.मज्जा मस्ती,दंगा शालेय वयात केलात तेवढे पुरे झाले आता.                पण काही मुले मात्र महाविद्यालयात गेल्यावर कानात वारे शिरावे तसेच वागायचे.शिक्षकांनी कितीही सांगितले तरी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे.असे वागणे त्याच मुलांचे होते,ज्यांना अभ्यासाची आवडच नसायची.आम्ही मात्र असे नव्हतो.              काही मुले खुप हुशार,शांत,अभ्यास एके अभ्यास, कोणाशी बोलणे नाही,अभ्यास करून शिक्षकांच्या मनावर राज्य करणारी,पण आम्ही यातले सुद्धा नाही बरं का...!       ...