Skip to main content

Posts

कांदिवली येथे चारकोप विधानसभा भाजपा उमेदवार योगेश सागर यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधी उमेदवारांना भरली धडकी

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. १६१, चारकोप विधानसभा मधील भाजपाचे कार्यसम्राट आमदार योगेश सागर यांना प्रचार फेरी दरम्यान वाढती लोकप्रियता मिळत असल्याचे पाहून विरोधकांना धडकी भरली.कांदिवली चारकोप चौथ्या वेळी विधानसभा निवडणूक लढवित असलेल्या भाजप योगेश सागर यांनी या विभागात पाणी,रस्ते, लाईट, शौचालय,दवाखाने,खेळाची मैदाने, नवीन शाळा,कालेज, महिलांना शिलाई मशीनचे , मेंदी क्लास, ब्युटी पार्लर ट्रेनिंग, श्रवण यंत्र,मुला मुलींना महागाडे शाळा कॉलेज प्रवेश देणे,गरिब मुला मुलींना उच्च शिक्षण देणे,विज दर वाढीच्या विरोधात मोर्चा काढणे,गरिब मुलीचे सामुहिक विवाहाचे आयोजन, संसार उपयोगी वस्तू देणे, आरोग्य शिबीर, रक्त दान शिबीर, दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम चे आयोजन,गरिब,मुला मुलींना शिक्षणासाठी संगणक मुफ्त देणे, रुग्णांना लहान मोठ्या शस्त्रक्रिया साठी आर्थिक मदत करणे, विभागातील झोपडपट्टी एस,आर, योजनेत रहिवासीच्या बाजूने उभे राहणे, विकासकाकडून इमारत चांगल्या सुस्थितीत तयार करून घेणै,रुम च्या चावी वाटप करणे,पोयसर नदीतील पाण्यातील गाळ काढणे, वगैरे वगैरे प्रकारची कामे कार्यसम्राट आमद...

भव्य रांगोळी प्रदर्शन अस्मिता संस्थे द्वारे आयोजित

  दरवर्षी प्रमाणे यंदाही अस्मिता सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य करणारी संस्थेमार्फत जोगेश्वरी येथे भव्य रांगोळी स्पर्धात्मक प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले आहे.  श्री. विनायक पेडणेकर, श्री.सुधीर गोरे ह्यांच्या सहकार्याने आणि श्री संकेत भगत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. या वर्षाच्या  रांगोळी  प्रदर्शनात प्राप्ती  पेडणेकर, रोहिणी जाधव, सुजाता सैल, मिताली गार्डे, शुभम जाधव, त्रिशला रहाटे, करण पांचाळ, सायली खानविलकर, मयुरेश सुर्वे, वैभव काशीकर, निधि पावसकर, चंद्रशेखर पांचाळ, आस्था बाथरे, सुचिता सुतार, ऋषी गौरत, निखिल गुरव, वृध्दी मोरजकर ॲड. रोहिणी जाधव इत्यादी रांगोळी कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली आहे. सदर प्रदर्शनाला मराठी, चित्रपट आणि मालिका मधील कलाकार  भेट  देणार  आहेत.  हें प्रदर्शन मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर ते रविवार दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत संध्याकाळी ६ ते ९  ह्या  वेळेत प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे स्थळ :...

'शब्द माझे तुझ्याचसाठी' काव्यसंग्रह आणि 'मयूरस्पर्श ' चारोळी संग्रह प्रकाशन सोहळा थाटात संपन्न

   सर्वपरिचित कवयित्री, समाज कार्यकर्त्या सौ. अश्विनी सचिन बोलके यांच्या 'शब्द माझे तुझ्याचसाठी' या काव्यसंग्रहाचे आणि  निवेदक, गायक अभियंता कवी मयूर महादेव पालकर यांच्या 'मयूरस्पर्श' चारोळी संग्रहाचे प्रकाशन अभियंता भवन नवीन पनवेल येथे दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ साहित्यिक - सुप्रसिद्ध गझलकार ए.के. शेख तसेच प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष - ज्येष्ठ पत्रकार श्री. दुर्गेश सोनार, कवयित्री, शिक्षिका सौ.मानसी नेवगी, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे आणि सबोर्डीनेट इंजिनीअर असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर अशा दिग्गज मान्यवरांच्या आणि आप्तेष्ट व कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.  दुर्गेश सोनार यांनी कवयित्री अश्विनी बोलके यांच्या 'शब्द माझे तुझ्याचसाठी' या पुस्तकाबद्दल,*"या काव्यसंग्रहातील कविता सकस, सशक्त आणि सामर्थ्यशाली आहेत तसेच हा काव्यसंग्रह असला तरी संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागू शकतात,इतक्या त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत."* असे बोल व्यक्त केले. *"मनास ह...

समाज परिवर्तन करण्यासाठी ज्या सदैव आपल्या विचारातून कर्मातून प्रयत्न करत असतात अशा मार्गदर्शिका , लेखिका आम्रपाली धेंडे मॅडम यांचे नाटक कलांतर ......एक हृदयस्पर्शी कथा ...दिग्दर्शक चिन्मय मायदेव

दिनांक : 9/11/20224 रोजी डोंबिवली पूर्व या ठिकाणी कलांतर.... एक हृदयस्पर्शी कथा हे नाटक संपन्न करण्यात आले लेखिका आम्रपाली धेंडे यांनी या नाटकातून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे हे नाटक प्रत्येकाने पाहून कुटुंबा चा  दृष्टिकोन बदलवण्याचा प्रयत्न केला आहे . कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे असे मत लेखिका आम्रपाली धेंडे यांनी व्यक्त केले आहे. मुलांना समजून घेऊन त्यांना वेळ दिला पाहिजे त्यांना प्रेम दिले पाहिजे . या नाटकाचे सुंदर असे दिग्दर्शन चिन्मय मायदेव सरांनी केले आहे . चिन्मय सर यांच्यात ही एक छान कला आहे सर्वांना एकत्रित घेऊन छान असे दिग्दर्शन करतात त्यामुळे अभिनय हा छान प्रकारे पार पडला जातो तसेच तसेच या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे  रश्मी वर्मा  ( प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड मॉडेल )  मनाने पाटील .. समाजसेविका   प्राजक्ता बर्वे   :: नृत्य विशारद   स्मिता माटेकर .. Model या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून समजा मध्ये छान परिवर्तन घडून येईल आणि हे नाटक प्रत्येकाने पहावे...

शब्द माझे तुझ्याचसाठी " आणि "मयूरस्पर्श " प्रकाशित

        उत्तोमत्तम कथा कवितासंग्रह निर्माण करणाऱ्या  साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे  कवयित्री अश्विनी सचिन बोलके यांचा 'शब्द माझे तुझ्याचसाठी' हा काव्यसंग्रह तसेच कवी मयूर महादेव पालकर यांचा 'मयूरस्पर्श' हा चारोळीसंग्रह नवीन पनवेल येथील अभियंता भवन, आकुर्ली येथे प्रकाशित झाला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक - सुप्रसिद्ध गझलकार ए.के. शेख तसेच प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष - ज्येष्ठ पत्रकार श्री. दुर्गेश सोनार, कवयित्री,शिक्षिका सौ.मानसी नेवगी, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे आणि सबोर्डीनेट इंजिनीअर असं असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर आणि इतर मान्यवर  उपस्थित होते.  सदर मान्यवरांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते 'शब्द माझे तुझ्याचसाठी' आणि 'मयूरस्पर्श' या पुस्तकांचे अनावरण केले गेले. कवयित्री अश्विनी बोलके आणि मयूर पालकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बुगटे आलूर ग्रामस्थ संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सक्रिय कार्यकर्ते संजय पालकर यांनी कवयित्री अश्विनी बोलके यांच्य...

गैरसमज

            राहुल आणि मी एकाच कॉलेज मध्ये शिकत होते. कॉलेजचा पहिला दिवस होता सगळे अनोळखी होते म्हणून कुणीकुणाशी बोलले नाही.        आठ दिवस असेच निघून गेले हळू हळू ओळख झाली मुलं मुली बोलायला लागलो मैत्री झाली.          एक दिवस अचानक नवीन मुलगा वर्गात आला आणि आजच ऍडमिशन घेतलं असं सांगितलं सगळ्यांची ओळख करून घेतली खूप हुशार शांत लाघवी होता राहुल आमची मैत्री लगेच झाली.        फस्ट सेम झाली आणि आणि आम्हाला सुट्टया लागल्या सगळे घरी गेले. राहुल शिवाय करमत नव्हतं कधी सुट्टी संपते असं झालं होत. मी राहुल ला कॉल केला तो म्हणाला हा "रूपा "बोल कसा फोन केला. मी म्हणाले सहज केला सुट्टया संपतील सेकण्ड सेम सुरु होईल अभ्यास वाढेल तेंव्हा जरा अभ्यासाचं नियोजन करावं,,,,,,,, राहुल म्हणाला हेच कारण आहे ना कि दुसरं काही कारण आहे असेल तर सांग,,,,,,, मी शांत झाले राहुल हसून म्हणाला करमत नाही का माझ्याशिवाय बोलावं वाटतं कि भेटावं वाटतं येऊ का भेटायला कि प्रेमात पडली आहेस,,,,,,, माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी हस...

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...