Skip to main content

Posts

कवी बाळासाहेब तोरस्कर यांना साहित्य सेवा गौरव पुरस्कार जाहीर

  ठाणे/प्रतिनिधी : येथील  जेष्ठ कवी , लेखक समाजसेवक, पत्रकार प्रा.बाळासाहेब तोरस्कर यांना लेखन अन् मी साहित्य समुह परिवार कोल्हापूर यांचा या वर्षीचा साहित्य सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्कार  सोहळ्याच्या अध्यक्षपदी ही त्यांची निवड करण्यात आली आहे .हा सोहळा वरद सभागृह गणेश मंदिर संस्थान , फडके रोड  डोंबिवली पूर्व येथे रविवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता लेखन अन् मी साहित्य समुहाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.‌ हा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक सतीश सोळांकुरकर , कवी विजय जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तोरस्कर हे साहित्यिक , सांस्कृतिक , सामाजिक, पत्रकारिता व फार्मास्युटिकल क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असून ते अनेक साहित्यिक व सामाजिक संस्थाचे संस्थापक पदाधिकारी आहेत. ते साहित्य संपदा दिवाळी अंकाचे निवासी संपादक, कृषिराज दिवाळी अंकाचे सहसंपादक, जायंट गृप आॅफ कोल्हापूर मेट्रो चे माजी अध्यक्ष व कौन्सिल मेंबर, राष्ट्रीय श...

श्री दिनेश खैरे यांना हिंदी आयडल आंतरराष्ट्रीय सन्मान...

पुणे जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी श्री दिनेश ताराचंद खैरे यांना नेपाळ राज्यातील लुंबिनी शहरामध्ये आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय हिंदी कविता स्पर्धेच्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री खैरे यांना हिंदी आयडल आंतरराष्ट्रीय मानद उपाधि सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    देवनागरी लिपीचे संरक्षण , नेपाळ भारत मैत्री मजबूत करणे, आणि नवोदित साहित्यिकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सन्मान फाउंडेशन नेपाळ यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदी  कविता स्पर्धेमध्ये श्री दिनेश खैरे यांना हिंदी आयडल आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.      श्री दिनेश खैरे हे नवोदित कवी साहित्यिक आहेत. त्यांनी शिक्षा आणि साहित्य, संस्कृती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे योगदान दिले आहे, त्यांनी वृत्तपत्रे, मासिके,  साप्ताहिके  दिवाळी अंक यासारख्या माध्यमातून साहित्य लेखन केले आहे. त्यांची दोन पुस्तके प...

*"कवितेच्या पारावर" प्रस्तुत "कवितेचं गोत्र हरवलंय" मैफिलीचा दुसरा शुभारंभी प्रयोग संपन्न*

ठाणे: महाराष्ट्राच्या विविध भागातील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून , कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचे देखणे प्रयोजन केले होते.         हरवलेल्या रसिकांना शोधण्यासाठी तसेच कवितेच्या हरवलेल्या गोत्राला एकसुरी धाग्यात गुंफून नव्या रसिकतेचा शोध घेत ही कवींची मांदियाळी "कवितेच्या पारावर" आपला नाविन्यपूर्ण ठाण मांडून बसली होती.‌ या देखण्या मैफिलीचा नवी मुंबईत हा दुसरा शुभारंभी प्रयोग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनाला मनापासून साद घालत ठाणे,कुर्ला, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा विविध भागांतून कवींनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती.           कविता आणि गाणी वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या जाणाऱ्या ...

अभिप्राय. दिवाळी अंक - प्रवरेचे पाणी

आजही पूर्वीचे दिवाळीचे दिवस आठवतात...दिवाळीची स्वच्छता,फराळ बनविणे,कपडे,रांगोळी,दिवे,आकाश कंदील,माळा,फटाके खरेदी,घर रंगवणे,सजवणे इत्यादी कामे चालू असताना दिवाळी अंक वाचनाची खूप ओढ लागलेली असायची.वडील कधी दिवाळी अंक खरेदी करून आणतील आणि तो आपल्याला वाचायला मिळेल तो उत्साहच अदभुत होता.तोच उत्साह अजून ही आपल्या चेहऱ्यावर दिसतो,वागण्यातून जाणवतो,तीच धडपड,तोच अट्टाहास,अन् त्याच्या सोबत आता आपलेही लेखन सर्वांनी वाचावे यासाठीची उर्मी,त्यासाठी आपल्या मनातील विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे,त्याचे सर्वांनी कौतुक करणे,आपल्या कौतुकाने आई वडिलांच्या ,नातलगांच्या - मित्र मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंद, आपल्याला प्रेरणा देतो,हेच दिवाळी अंकाचे प्रचंड यश.           "प्रवरेचे पाणी" दिवाळी अंक हाती पडला अन् त्यावरील मुखपृष्ठ पाहून मन हेलावून गेले.किती सुंदर,अचूक मुखपृष्ठ आहे...ज्यांनी आपले संपूर्ण जीवन नेहमी इतरांना मदत करण्यात घालविले,आपल्या भारताचे अनमोल रत्न रतनजी टाटा.सरस्वती सोबत लक्ष्मीची कायम कृपा दृष्टी त्यांच्यावर होती.पण,नित्य विनम्र भाव त्यांच्या सात्विक चे...

कवि सरकार इंगळी यांचे कडून निराधर आश्रामास रेशन साहित्य मदत .

हातकणंगले      कवि सरकार इंगळी व त्यांचे सहकारी यांनी निराधर आश्रमात रेशन साहित्य देऊन मदतीचा हातभार लावला आहे       आष्टा तालुका पलूस येथील अमर गंगथडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून चालवत असलेल्या निराधर आश्रमात वयवृद्ध पुरुष महिला 'दिव्यांत' मनोरुग्ण अशा व्यक्तीची समाजसेवा म्हणून सामाजिक बांधिलकी जपत आहेत . कोणतेही शासनाचे अनुदान देणगी मिळत नसताना समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीने ते निरावर लोकांच्याकाठी आश्रम चालवत आहेत .       कवि सरकार इंगळी यांनी त्यांच्या आश्रमात जाऊन निरांधराना रेशन साहित्य मदत देणेचे कार्य केले आहे यासाठी अनिल दानोळे ( दिवाणजी ) भरत कणिरे ' हसन पटेल  माळवे व्यापारी 'प्रदिप कोळी प्रशांत भातमारे इंगळी विकास सोसायटी नंबर १ व २ स्वस्त धान्य दुकान . जिनेंद्र अकिवाटे यांचेही यांचेही  मोलाचे सहकार्य लाभले .

कांदिवली येथे चारकोप विधानसभा भाजपा उमेदवार योगेश सागर यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधी उमेदवारांना भरली धडकी

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. १६१, चारकोप विधानसभा मधील भाजपाचे कार्यसम्राट आमदार योगेश सागर यांना प्रचार फेरी दरम्यान वाढती लोकप्रियता मिळत असल्याचे पाहून विरोधकांना धडकी भरली.कांदिवली चारकोप चौथ्या वेळी विधानसभा निवडणूक लढवित असलेल्या भाजप योगेश सागर यांनी या विभागात पाणी,रस्ते, लाईट, शौचालय,दवाखाने,खेळाची मैदाने, नवीन शाळा,कालेज, महिलांना शिलाई मशीनचे , मेंदी क्लास, ब्युटी पार्लर ट्रेनिंग, श्रवण यंत्र,मुला मुलींना महागाडे शाळा कॉलेज प्रवेश देणे,गरिब मुला मुलींना उच्च शिक्षण देणे,विज दर वाढीच्या विरोधात मोर्चा काढणे,गरिब मुलीचे सामुहिक विवाहाचे आयोजन, संसार उपयोगी वस्तू देणे, आरोग्य शिबीर, रक्त दान शिबीर, दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम चे आयोजन,गरिब,मुला मुलींना शिक्षणासाठी संगणक मुफ्त देणे, रुग्णांना लहान मोठ्या शस्त्रक्रिया साठी आर्थिक मदत करणे, विभागातील झोपडपट्टी एस,आर, योजनेत रहिवासीच्या बाजूने उभे राहणे, विकासकाकडून इमारत चांगल्या सुस्थितीत तयार करून घेणै,रुम च्या चावी वाटप करणे,पोयसर नदीतील पाण्यातील गाळ काढणे, वगैरे वगैरे प्रकारची कामे कार्यसम्राट आमद...

भव्य रांगोळी प्रदर्शन अस्मिता संस्थे द्वारे आयोजित

  दरवर्षी प्रमाणे यंदाही अस्मिता सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य करणारी संस्थेमार्फत जोगेश्वरी येथे भव्य रांगोळी स्पर्धात्मक प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले आहे.  श्री. विनायक पेडणेकर, श्री.सुधीर गोरे ह्यांच्या सहकार्याने आणि श्री संकेत भगत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे. या वर्षाच्या  रांगोळी  प्रदर्शनात प्राप्ती  पेडणेकर, रोहिणी जाधव, सुजाता सैल, मिताली गार्डे, शुभम जाधव, त्रिशला रहाटे, करण पांचाळ, सायली खानविलकर, मयुरेश सुर्वे, वैभव काशीकर, निधि पावसकर, चंद्रशेखर पांचाळ, आस्था बाथरे, सुचिता सुतार, ऋषी गौरत, निखिल गुरव, वृध्दी मोरजकर ॲड. रोहिणी जाधव इत्यादी रांगोळी कलाकारांनी आपली कलाकृती सादर केली आहे. सदर प्रदर्शनाला मराठी, चित्रपट आणि मालिका मधील कलाकार  भेट  देणार  आहेत.  हें प्रदर्शन मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर ते रविवार दिनांक १७ नोव्हेंबर पर्यंत संध्याकाळी ६ ते ९  ह्या  वेळेत प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे स्थळ :...