Skip to main content

Posts

मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांची पत्रकारांची मातृ संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांच्या नाशिक विभागीय सचिवपदी नियुक्ती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी जाहीर केली. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मनमाड (प्रतिनिधी) : नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल खरे यांची पत्रकारांची मातृ संघटना असलेली मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांच्या नाशिक विभागीय सचिवपदी नियुक्ती परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी जाहीर केली. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  पत्रकारांची मातृसंस्था असलेली मराठी पत्रकार परिषदेच्या कोअर कमिटीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्तयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विभागीय सचिवांच्या नियुक्त्या करताना तरूणांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्य विश्वस्त  एस. एम. देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, गणेश मोकाशी उपस्थित होते. यावेळी देशमुख आणि नाईक म्हणाले की परिषदेच्या संघटनात्मक रचनेत विभागीय सचिवांना विशेष महत्व आहे. पत्रकारांच्या समस्यांसह आपल्या विभागात सं...

मान्यवर आदरणीय प्रा.नागेश सर

  वाचिता दैनिक विदर्भ सत्यजीत  आनंदाश्रु नयनी आले  कष्टाविना फळ नाही  हे आपण सिद्ध केले  पाहता रुप आपुले दिसे चेहऱ्यावर हास्य  कलागुणांनी संपन्न  असे कर्तृत्वाचे यश शिक्षकी बाणा आपुला  अध्ययन अध्यापनात प्राण ज्ञानार्जनासाठी तळमळ साहित्याची घेतली आण नाईट हायस्कूल अध्यापन दिवसा असे समाजकार्य शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक  क्षेत्र चौफेर  करी‌ सत्कार्य  आठवतो तो दिवस कवितेत केले मार्गदर्शन नाही विसरणार कधी आहात आपण मार्गदर्शक वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई दैनिक  वाचनीय ,अर्थपूर्ण साहित्य ज्ञानात पडे भर वाचनाने मन उत्साहित वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई दैनिक  लिखाण करते आनंदाने विचारांना मिळे चालना कविता,लेख लिहिण्याने पुरस्काराने सन्मानित  आपण नेहमीच व्हाल हीच सदिच्छा सारस्वतांची  यशोशिखर गाठाल सौ. रजिता रविन्द्र चव्हाण  बोरिवली मुंबई.

*मनातील खदखद...*

        आपण माणूस म्हणून या भूतलावर जन्मा आलो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.हा जन्म पुन्हा नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.मृत्यू आपल्या हातात नाही,तो कधी,कसा येईल काही सांगू शकत नाही.त्याला काही कारण लागत नाही...झोपेत ही जावू शकतो? किंवा भयाण अपघात मधून सुखरूप वाचूही शकतो.म्हणून लाभलेल्या जन्मांचे सार्थक करावे असे मला तरी वाटते."*केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे.*"           प्रत्येक चांगल्या,अवघड गोष्टीची सुरुवात त्रासदायक असते.रूढी,परंपरा या हळू हळू बदलल्या पाहिजे,किंबुहना तो निसर्ग नियम आहे.आपली एवढी मोठी लिखित राज्यघटना वेळ प्रसंगी बदलता येतात..त्यातील कलमे काढणे किंवा नवीन कलमे त्यात मिळविणे.मग,या रूढी, परंपरा का बदलता येत नाही.स्वार्थ साधण्यासाठी बऱ्याच गोष्टी परंपरा नावाखाली केल्या जातात.विज्ञान फक्त शिकतो किंवा शिकवितो... पण,प्रत्यक्ष जीवनात त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही.जन्म,मृत्यू सजीवांची लक्षणे आहेत,ते कोणाच्या ही हातात नाही.मग,प्रत्येक जण मृत्यू पावणार आहे.हे अंतिम सत्य तर सर्वांनाच मान्य असावे....

*बनावट चलनी नोटां बाळगणा-या दोघांचा सावदा येथे पर्दाफाश*

   जळगाव [ राजेंद्र चौधरी ] :- १३डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांना सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे इसम येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरुन वरिष्ठ पोलीस अधिकार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयितांना शिताफिने पकडण्यात यश मिळाले.           सावदा शहरात बनावट नोटा बाळगणारे दोन संशयित नावे शेख आरिफ शेख फारुक, अझरखान आयुब खान दोघे ख्वाजा नगर सावदा येथील राहणार असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडून भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या शंभर रुपये दराच्या ७६ चलनी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण ३७,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून  यातील मुख्य सुत्रधाराचा शोध पोलीस घेत आहे.

तिफण कविता महोत्सवाच्या निमित्ताने

  कन्नड तालुक्याला समृद्ध असा नैसर्गिक , ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक गावात नाटय कलावंत असून त्यांनी ही नाटयपरंपरा आजही जिवंत ठेवली आहे. जागर गोंधळ, कीर्तन, भारूड आदी लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम करणारे मान्यवर येथे आहे. आदिवासी ठाकर, भिल्ल आणि बंजारा हे समुदाय आजही  आपले सांस्कृतिकपण जपतांना दिसतात. गणेश उत्सव, नवरात्री उत्सव आणि गावोगावी होणाऱ्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तालुक्याचे भूमिपुत्र मा. मानसिंह पवार यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने कन्नड तालुका महोत्सव, लोकतेने बाळासाहेब पवार सांस्कृतिक उत्सव आणि आता सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाच्या माध्यमातून सहकार महर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सव, फिल्म फेस्टिवल, व्याख्यानमाला तसेच इतर कार्यक्रम सातत्याने होत आहेत. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचा जिजाऊ महोत्सव, पिशोरच्या समता विद्यालयाचा समता महोत्सव हे तालुक्याच्या नावलौकिकात महत्वाचे योगदान देत आहेत. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग साहित्यिक कार्यक्रम घेव...

गरजू वधू वरांच्या पालकांनी बोगस विवाह संस्थे पासून सावध रहावे... पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.

सध्या महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी बोगस विवाह संस्थेचे जाळे पसरले असल्याने गरजू वधूवरांच्या पालकांनी त्या पासून सावध रहावे असे आवाहन पत्रकार भारत कवितके यांनी केले आहे.या बोगस विवाह संस्था प्रथम गरजू वधू वरांच्या पालकांशी संपर्क साधतात, त्यांच्या अपेक्षा विचारुन घेतात,त्याच प्रमाणे मन मानेल तशी फी आकारली जाऊन बोगस विवाह संस्थेत नाव नोंदणी केली जाते.अपेक्षित स्थळांचे संपर्कासाठी मोबाईल नंबर, पत्ता, घेऊन ते गोपनीय ठेवले जाते.व समोर पालकांना सांगतात " तुम्हाला हवे तसे स्थळ आलेले आहे.आम्ही बैठक घडवून आणतो, त्या आधी तुम्ही बैठकीची अमुक अमुक रक्कम जमा करावी.गरजू पालक पैसे जमा करतात, पुन्हा विवाह संस्था बैठकीच्या आयोजनाचे  वेळी वेगवेगळी कारणे सांगून बैठक घेण्यास टाळाटाळ करतात.यात पालक फसतात.मोबाईल वरुन विवाह संस्थेशी संपर्क केला असता "आपण नंतर संपर्क करा"  म्हणून कळविले जाते, किंवा फोन उचलला जात नाही,अशा बोगस विवाह संस्थेचे जाळे सगळीकडे पसरलेले आहे.पुणे, मुंबई, मुंबई उपनगरे,लातुर, सोलापूर, सातारा,या ठिकाणी व पश्चिम महाराष्ट्र मधील काही ठिकाणी अशा बोगस वि...

आईवडिलांचं हसू जपुयात

उतारवयात आल्यावर एका विशिष्ट काळानंतर आपले आईवडील आतून धास्तावत असतात. वाढतं वय आणि हातून सुटत जाणाऱ्या काही गोष्टी त्यांना आपण परावलंबी होत आहोत याची जाणीव करून देतात. काहींना ते सहज स्वीकारता येते तर काहींना ते प्रचंड अवघड वाटू शकते. अशावेळी अपत्य या नात्याने आपल्याला ती फेज योग्यरीत्या समजली पाहिजे. लहानपणापासून आपण आपले हट्ट त्यांच्यावर थोपवलेले असतात, तरुणपणी आपण आपल्या सडेतोड भूमिका त्यांच्यासमोर मांडलेल्या असतात त्यामुळे आपण हक्काने आपली चिडचिड, राग त्यांच्यासमोर व्यक्त करत आलेलो असतो पण आईवडील उतारवयात आल्यावर अपत्यांनी ही भूमिका बदलायला हवी. कारण या काळात आजारपण, संथपण, असंख्य आठवणींचा भार त्यांच्या मनावर गारूड घालून असतो. आसपासची त्यांच्या वयाची त्यांना सोडून गेलेली माणसं त्यांच्या दुखाचं कारण असू शकतात, ते आपण समजलं पाहिजे. त्यात त्यांना फक्त तुमच्या विश्वासाची आणि दोन आदरयुक्त शब्दांची गरज असते. अशावेळी तुमचा आततायीपणा, राग, हट्टीपणा त्यांना डिप्रेस्ड करू शकतो. त्यामुळे तुम्ही आयुष्यभर जरी आई वडिलांसमोर कोणतेही हक्क गाजवलेले असले तरी आता मात्र तुम्ही त्यांच्या य...