Skip to main content

Posts

*प्रत्येक विभागीय महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवनाची निर्मिती*

नवी मुंबई प्रतिनिधी:- सुचित्रा कुंचमवार ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था ही संस्था अखिल भारतीय जेष्ठ नागरिक कॉन्फरन्स व महाराष्ट्र  ज्येष्ठ नागरिक फेडरेशन व नेरूळ ज्येष्ठ नागरिक संस्था या संस्थांची शिखर संघटना आहे. या संस्थेची बैठक दिनांक 29/3/2025 रोजी संपन्न झाली. या बैठकीत सन 2025 - 26 या वर्षातील उद्दिष्टांवर चर्चा करतांना संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एन. चापके यांनी विभागीय मुख्यालयाच्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवनाची निर्मिती करण्यात यावी असे  आवाहन केले. यासाठी त्या  क्षेत्रातील  सर्व ज्येष्ठ नागरिक संघानी, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींकडून सहकार्य घ्यावे तसेच सी.एस.आर.व दानशूरांकडून  देणगीव्दारे हा प्रकल्प साकार करावा असे मत मांडले .असे प्रकल्प साकार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था उचित मार्गदर्शन करेल असेही आश्वासन दिले. या बैठकीला श्री.पांडुरंग क्षेत्रमाडे खजिनदार, श्री. प्रभाकर गुमास्ते सहसचिव , डॉ. अण्णासाहेब टेकाळे सदस्य, श्री. अरविंद वाळवेकर, सदस्य, श्री अंकुश जांभळे सदस्य, श्री. चंद्रकांत महामुन...

पुस्तक समीक्षणपुस्तकाचे नाव:- मी अहिल्या आहे(ऐतिहासिक कादंबरी)लेखिका:- रंजना फतेपुरकर( मै अहिल्या हूं)अनुवादक:- डॉ.एन.जी.काळे( हिंदी भाषेतून मराठीत अनुवाद)प्रकाशक:- श्री.सर्वोत्तम प्रकाशन,इंदोरमूल्य::-२०० रुपये एकूण पृष्ठ:- १०४समीक्षक:- सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण,पुणे ४४

पुस्तक समीक्षण पुस्तकाचे नाव:- मी अहिल्या आहे (ऐतिहासिक कादंबरी) लेखिका:- रंजना फतेपुरकर( मै अहिल्या हूं) अनुवादक:- डॉ.एन.जी.काळे( हिंदी भाषेतून मराठीत अनुवाद) प्रकाशक:- श्री.सर्वोत्तम प्रकाशन,इंदोर मूल्य::-२०० रुपये  एकूण पृष्ठ:- १०४ समीक्षक:- सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण,पुणे ४४ पुस्तक म्हणजे आत्मा असतो.त्यात ऐतिहासिक कादंबरी जीव की प्राण.त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित रंजना फतेपुरकर मॅडम यांनी लिहिलेली ही कादंबरी मूळ हिंदी भाषेतील आहे,मैं अहिल्या हूं.त्याचे अनुवादक डॉ.एन.जी.काळे सर आहेत.         या पुस्तकाला श्रीमंत यशवंतराव होळकर सर,डॉ.सुधीर तांबे सर,घनश्याम होळकर सरांच्या ही शुभेच्छा लाभलेल्या आहेत.तसेच या पुस्तकाची डॉ.देवेंद्र जोशी सरांनी समीक्षा केलेली आहे.रंजना मॅडम यांचे सुंदर असे मनोगत अन् आभार.तसेच रंजना मॅडम यांनी हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी अर्पण केलेले आहे.           पुस्तकाची भाषा ओघवती आहे.सर्व सामान्य व्यक्तींना ही भाषा समजेल त्यामु...

रणजित पवार लिखित ममता पहिलवान या पुस्तकासराज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ओतूर - राष्ट्र सेवा परिषद आणि मराठबोली संस्था ,पुणे यांच्या वतीने, दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना व विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केल्या जाते. यावेळेस श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ओतूर येथील कवी,लेखक रणजित पवार लिखित व लेण्यांद्री प्रकाशनाने प्रकाशित केलेले, देशातील पहिली महिला कुस्तीपटू ममता पहिलवान या पुस्तकास ' राज्यस्तरीय प्रभुरत्नाई साहित्य गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.      १०० वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील पाटोळे या गावची महिला ममता पहिलवान यांनी कुस्तीक्षेत्रात फार मोठे नाव कमावले होते. त्याकाळात पुरुषासंगे संपूर्ण कपडे काढून फक्त लंगोट घालून आखाड्यात उतरत असे.त्यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढ्या कुस्त्या खेळल्या तेवढया संपूर्ण जिंकल्या.त्यांची परिसरामध्ये 'ममत्या पहिलवान ' म्हणून आजही ओळख आहे. त्यांचे जीवनचरित्र म्हणजे आजच्या तरुणांसाठी,खास करून मुली व महिलावर्गासाठी एक आदर्श आहे.प्रेरणा देणारे आहे.कारण ज्या काळात महिलांवर अनेक बंधने होती.त्याकाळात पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीखेळामध्ये ममता पहिलवान पुरुष बनून नि...

रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा... संभाजी राजे छत्रपती यांची मागणी तर महाराष्ट्रातील धनगर समाज यास तीव्र विरोध करेल.. बाळासाहेब दौडतले.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. रायगडावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या मागणीसाठी संभाजी राजे छत्रपती यांच्या या मागणीला महाराष्ट्रातील धनगर समाज तीव्र विरोध करेल असे बीड मधील धनगर समाजाचे बाळासाहेब दौडतले यांनी जाहीर केले, यावरून महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरण अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे की, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ में २०२५ पूर्वी हटविण्यात यावी, वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठे ही संदर्भ, उल्लेख आढळत नसल्याने आणि भारतीय पुरातत्व विभागाने देखील वाघ्या बाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक काळ संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते,१०० वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी केलेली असून त्यावर मात्र बीड मधील धनगर समाज बांधव तीव्र आक्रमक झालेला असल्याने महाराष्ट्रात नविन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत, धनगर समाजाला व...

*महिला दिन विशेष माझा प्रवास उलगडताना कार्यक्रम संपन्न*

(नवी मुंबई): आप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नवी मुंबई साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी  साहित्य परिषद, योग विद्या निकेतन वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत महिला दिन विशेष कार्यक्रम 'माझा प्रवास उलगडताना' संपन्न झाला. नवी मुंबईतील कर्तबगार महिलांशीशी संवाद त्यांचा जीवन प्रवास असा या कार्यक्रमाचा विषय होता. प्रातिनिधिक स्वरूपात काही खास महिलांचा तेथे सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी,लेखक,पत्रकार मा.दुर्गेश सोनार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा.नंदकिशोर जोशी, कार्यवाहक डॉ.अरुंधती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षमा वाखारकर यांनी केली तर सूत्रसंचालन सौ.ऋतुजा गवस यांनी केले. या कार्यक्रमाला राधा गानू, शुभांगी पाटील, मीरा जोशी, स्मिता वाजेकर, श्रध्दा  साळस्कर, अक्षता गोसावी ऋतुजा  गवस, कल्पना देशमुख, भारती  वार्डेकर यांचा साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवी मुंब...

*कोकण मराठी साहित्य परिषद**ठाणे शहर शाखा आयोजित* *विषय:-मराठी भाषा: आजची परिस्थिती आणि साहित्य संस्था.**एक आगळावेळा परिसंवाद*

ठाणे : दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ठाणे महानगर पालिकेच्या मराठी शाळा क्रमांक १३ खोपट येथील शाळेच्या  हाॅलमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेतर्फे... मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी सदर कार्यक्रम आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी  प्रमुख पाहुणे प्रा. संतोष राणे शारदा प्रकाशन, मा. ज्योती कपिले जे के मिडिया,  मा.किशोर भोईर अस्मिता वाचनालय, डॉ. मनोज वैद्य , अध्यक्ष आणि, सूत्रधार व निवेदक श्री मोरेश्वर बागडे यांच्या अथक प्रयत्नातून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी काय उपाय योजना कराव्या लागतील त्यासाठी आपले नागरिक म्हणून योगदान तसेच पत्रकार, साहित्यिक आणि साहित्य संस्था मिळून काय करता येईल याबद्दल  परिसंवादाचे सूत्रधार श्री मोरेश्वर बागडे यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळींनी परखड विचार मांडले.  त्यावेळी  कार्यक्रमाला हजर असलेले ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतूरकर यांनी मराठी भाषेला हे दिवस कोणी आणले? असा प्रश्न प्रेक्षक म्हणून  व्याख्याते व रसिक प्रेक्षक यांना विचारला. त...

के.एल.पोंदा, डहाणू येथे होळी व धुलिवंदन निमित्ताने विविध उपक्रम!

      होळी व धुलिवंदन हा आनंदाचा, उत्साहाचा सण आपल्या महाराष्ट्रात साजरे केले जातात.या सणाचं महत्त्व लक्षात घेऊन शाळेत पर्यावरण पुरक विविध उपक्रम राबविले गेले.    शाळेचे प्राचार्य श्री.सोपान इंगळे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभेच्छांसह उपक्रम संपन्न झाले.होळीच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय हरित सेना व के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.यावेळी वेग वेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली. यातून झाडे लावा,झाडे जगवा संदेश देण्यात आला.                 होळी व धुलिवंदन सणानिमित्त देखील विविध उपक्रम... निबंध लेखन,यात पर्यावरण संवर्धन काळाची गरज!, तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, भेट कार्ड (ग्रिटींग कार्ड) तयार करणे, काव्यलेखन,काव्य वाचन, सादरीकरण, कथाकथन,असे विविध उपक्रम,शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका,सौ.अनुपमा जाधव यांनी या उपक्रमांचे आयोजन केले. यात इयत्ता ५वी ते९वीच्या  इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.           ...