Skip to main content

Posts

तिफण कविता महोत्सवाच्या निमित्ताने

  कन्नड तालुक्याला समृद्ध असा नैसर्गिक , ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक गावात नाटय कलावंत असून त्यांनी ही नाटयपरंपरा आजही जिवंत ठेवली आहे. जागर गोंधळ, कीर्तन, भारूड आदी लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम करणारे मान्यवर येथे आहे. आदिवासी ठाकर, भिल्ल आणि बंजारा हे समुदाय आजही  आपले सांस्कृतिकपण जपतांना दिसतात. गणेश उत्सव, नवरात्री उत्सव आणि गावोगावी होणाऱ्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तालुक्याचे भूमिपुत्र मा. मानसिंह पवार यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने कन्नड तालुका महोत्सव, लोकतेने बाळासाहेब पवार सांस्कृतिक उत्सव आणि आता सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाच्या माध्यमातून सहकार महर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सव, फिल्म फेस्टिवल, व्याख्यानमाला तसेच इतर कार्यक्रम सातत्याने होत आहेत. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचा जिजाऊ महोत्सव, पिशोरच्या समता विद्यालयाचा समता महोत्सव हे तालुक्याच्या नावलौकिकात महत्वाचे योगदान देत आहेत. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयाचा मराठी विभाग साहित्यिक कार्यक्रम घेव...

गरजू वधू वरांच्या पालकांनी बोगस विवाह संस्थे पासून सावध रहावे... पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.

सध्या महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी बोगस विवाह संस्थेचे जाळे पसरले असल्याने गरजू वधूवरांच्या पालकांनी त्या पासून सावध रहावे असे आवाहन पत्रकार भारत कवितके यांनी केले आहे.या बोगस विवाह संस्था प्रथम गरजू वधू वरांच्या पालकांशी संपर्क साधतात, त्यांच्या अपेक्षा विचारुन घेतात,त्याच प्रमाणे मन मानेल तशी फी आकारली जाऊन बोगस विवाह संस्थेत नाव नोंदणी केली जाते.अपेक्षित स्थळांचे संपर्कासाठी मोबाईल नंबर, पत्ता, घेऊन ते गोपनीय ठेवले जाते.व समोर पालकांना सांगतात " तुम्हाला हवे तसे स्थळ आलेले आहे.आम्ही बैठक घडवून आणतो, त्या आधी तुम्ही बैठकीची अमुक अमुक रक्कम जमा करावी.गरजू पालक पैसे जमा करतात, पुन्हा विवाह संस्था बैठकीच्या आयोजनाचे  वेळी वेगवेगळी कारणे सांगून बैठक घेण्यास टाळाटाळ करतात.यात पालक फसतात.मोबाईल वरुन विवाह संस्थेशी संपर्क केला असता "आपण नंतर संपर्क करा"  म्हणून कळविले जाते, किंवा फोन उचलला जात नाही,अशा बोगस विवाह संस्थेचे जाळे सगळीकडे पसरलेले आहे.पुणे, मुंबई, मुंबई उपनगरे,लातुर, सोलापूर, सातारा,या ठिकाणी व पश्चिम महाराष्ट्र मधील काही ठिकाणी अशा बोगस वि...

आईवडिलांचं हसू जपुयात

उतारवयात आल्यावर एका विशिष्ट काळानंतर आपले आईवडील आतून धास्तावत असतात. वाढतं वय आणि हातून सुटत जाणाऱ्या काही गोष्टी त्यांना आपण परावलंबी होत आहोत याची जाणीव करून देतात. काहींना ते सहज स्वीकारता येते तर काहींना ते प्रचंड अवघड वाटू शकते. अशावेळी अपत्य या नात्याने आपल्याला ती फेज योग्यरीत्या समजली पाहिजे. लहानपणापासून आपण आपले हट्ट त्यांच्यावर थोपवलेले असतात, तरुणपणी आपण आपल्या सडेतोड भूमिका त्यांच्यासमोर मांडलेल्या असतात त्यामुळे आपण हक्काने आपली चिडचिड, राग त्यांच्यासमोर व्यक्त करत आलेलो असतो पण आईवडील उतारवयात आल्यावर अपत्यांनी ही भूमिका बदलायला हवी. कारण या काळात आजारपण, संथपण, असंख्य आठवणींचा भार त्यांच्या मनावर गारूड घालून असतो. आसपासची त्यांच्या वयाची त्यांना सोडून गेलेली माणसं त्यांच्या दुखाचं कारण असू शकतात, ते आपण समजलं पाहिजे. त्यात त्यांना फक्त तुमच्या विश्वासाची आणि दोन आदरयुक्त शब्दांची गरज असते. अशावेळी तुमचा आततायीपणा, राग, हट्टीपणा त्यांना डिप्रेस्ड करू शकतो. त्यामुळे तुम्ही आयुष्यभर जरी आई वडिलांसमोर कोणतेही हक्क गाजवलेले असले तरी आता मात्र तुम्ही त्यांच्या य...

*मला भेटलेले व्यक्तिमत्त्व...*

        म्हणतात ना सर्व भेटी या आधीच ठरलेल्या असतात..त्या जीवनात जेव्हा होणार असतात तेव्हा च होतात. कोरोना काळात आपण स्वतः ला वेळ द्यायला लागलो....म्हणजे माझ्या दृष्टीने स्वतःला गुंतून ठेवू लागलो.आहे तो दिवस आनंदातच घालवायचा ...समोर कितीही कठीण प्रश्न आले तरी.जीवन एकदाच मिळते... हे सर्वांना माहिती.आपल्यातील कलागुण याच काळात आपण मानसोक्त पण पूर्ण करू लागलो.आणि लिखाणाकडे अलगद मी वळले गेले.जो माझ्या जगण्याचा एक सच्चा मार्ग बनला.याच मार्गाने जाताना खुप अफलातून व्यक्तींना भेटले.....त्यांचे विचार समजून घेतले..त्यांना जाणले..त्यांना कवितेतून,कथेतून,लेखातून,भाषणातून ...म्हणजे साहित्यातून समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला.या व्यक्तींच्या अंतर्मनात जाण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला.            यातील किंवा यापेक्षाही वेगळे व्यक्तिमत्त्व भावले मनाला ते म्हणजे माननीय सदाफुले सर तुम्ही.तुम्हाला साहित्य ,साजिक स्तरातील सर्वच जण मामा,मास्तर म्हणतात... आणि याच नावाने आवाजही देतात.माझ्या साहित्यिक मित्र परिवाराकडूनही तुमचे नाव नेहमी ऐकले होत...

*आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिमाखात संपन्न*

पुणे(प्रतिनिधी): मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे. आणि रोटरी क्लब ऑफ पर्वती, पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा विकास, संवर्धन व्हावे, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा. या उद्देशाने मातृ‌भाषा अध्यापक संस्था, पुणे . विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करत असते. त्यांपैकीच एक उपक्रम म्हणजे नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन. नाव्यवाचन करताना विद्यार्थ्यांमधील वाचिक अभिनयास संधी मिळते. या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध भावना व्यक्त करताना आवाजात चढउतार कसे करायचे. आवाज लहान मोठा कसा करायचा. कोणत्या शब्दांवर आघात द्यायचा. याविषयी मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडण्यात याचा मोठा वाटा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.डॉ.मोहन कांबळे, प्राचार्य, आदर्श बी.एड्. कॉलेज कर्वेरोड, पुणे यांनी भूषविले. मा.डॉ. वृषाली खिरे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ-पर्वती पुणे- या प्रमुख पाहुण्या होत्या. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मा.प्रज्ञा देशपांडे, सहशिक्षिका , अभिनव विद्यालय, हायस्कूल यांनी आपल्य...

येवती येथे भोई समाज संघटनेची सभा संपन्न प्रलंबित प्रश्न व आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चात्मक प्रकाश

सुनील शिरपुरे/यवतमाळ महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेनेचे वतीने भोई समाजाचे प्रलंबित घरकुल, रोजगार, मासेमारी, शिक्षण, विधवा महिलांचे प्रश्न, इतर व्यवसाय, वसतिगृह तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करणे, राळेगाव येथे भोई समाज जोडो कृती कार्यक्रम, वधुवर परिचय मेळावा घेण्याकरिता सद्गुरु संत सोनामाता मंदिर डोमाघाट येवती येथे वडकी जिल्हा परिषद गणातील भोई समाजाच्या निवडक कार्यकर्त्यांची भोई समाजाचे नेते श्री मारोतराव पडाळ यांचे नेतृत्वात सभा घेऊन वरील विषयांवर चर्चा करण्यात आली. भोई समाजाचे प्रलंबीत प्रश्न मांडण्याकरीता कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. राळेगाव येथे भोई समाजाचा भव्य मेळावा घेण्याकरीता ठराव घेण्यात आला तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता प्रतिनिधित्व करण्याचे एकमताने ठराव करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते मा.श्री रामकृष्णजी घरडे होते. . अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सांगितले की, भोई समाज अतिशय मागास आहे. भोई समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या प्रत्ये...

आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिमाखात संपन्न !

मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे. आणि रोटरी क्लब ऑफ पर्वती, पुणे.यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा विकास,संवर्धन व्हावे,विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा. या उद्देशाने मातृ‌भाषा अध्यापक संस्था, पुणे . विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करत असते . त्यांपैकीच एक उपक्रम म्हणजे नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन . नाव्यवाचन करताना विद्यार्थ्यांमधील वाचिक अभिनयास संधी मिळते .या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध भावना व्यक्त करताना आवाजात चढउतार कसे करायचे .आवाज लहान मोठा कसा करायचा. कोणत्या शब्दांवर आघात द्यायचा. याविषयी मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडण्यात याचा मोठा वाटा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. मोहन कांबळे. प्राचार्य, आदर्श बी.एड्. कॉलेज कर्वेरोड, पुणे,यांनी भूषविले. मा . डॉ वृषाली खिरे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ-पर्वती पुणे- या प्रमुख पाहुण्या होत्या. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  मा. प्रज्ञा .देशपांडे, सहशिक्षिका , अभिनव विद्यालय, हायस्कूल यांनी आपल्या सुमधूर...