Skip to main content

Posts

*नीलपुष्प साहित्य मंडळाचे सहा साहित्यिकांना ठाणे भूषण ओतूर भूषण स्व. डॉ. नारायण तांबे स्मृति जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान*

  *प्रा. सुरेश गे डुंबरे लिखित ' मन पाखरू काव्य संग्रहाचे शानदार प्रकाशन..* ठाणे: दिनांक १ जून  २०२५ रोजी आनंद विश्व गुरुकुल ठाणे येथील सभागृहात नीलपुष्प साहित्य मंडळाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि स्व. डॉ. नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नीलपुष्प साहित्य मंडळातील ज्येष्ठ साहित्यिक मंडळीना त्यांच्या सेवेची पोचपावती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्व डॉ नारायण तांबे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकूण सहा साहित्यिकांना स्व. डॉ  नारायण तांबे जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  याप्रसंगी अध्यक्ष म्हणून राजेश साबळे ओतुरकर (ज्येष्ठ साहित्यिक) प्रमुख पाहुणे म्हणून मा. विष्णूपंत कोरडे (माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई) मा. सुरेश डुंबरे (लेखक आणि समाजसेवक मुंबई)  कार्यक्रमातील विशेष उपस्थिती मा. डॉ प्रविण डुंबरे (साहित्यिक पुणे) विजयराज बोधनकर,(ज्येष्ठ चित्रकार ठाणे) मा. संजय नलावडे (सुप्रसिद्ध स्तंभ लेखक मुंबई) रविंद्र आवटी (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) मा. सुधाकर भालेराव (सामाजिक कार्यकर्ते मुंबई) प्रा. सुरेश डुंबरे (ज...

*प्रा. रावसाहेब राशिनकर यांची महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड*

अहिल्यानगर (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता. नेवासा, जि. अहिल्यानगर चे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व विद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब भिकाजी राशिनकर (साहेब) यांची महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी  कोळेकर साहेब यांनी केली आहे. प्रा. रावसाहेब राशिनकर यांचे शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून ते  रयत समाचार, दैनिक आकर्षण, दैनिक जलभूमी, दैनिक बीड प्रसार, दैनिक लोकआवाज, दैनिक लोकमंथन, साप्ताहिक राष्ट्रहित सर्वोपरी यांसह विविध वृत्तपत्र, ऑनलाईन वेब पोर्टल, डिजिटल न्यूज चॅनल साठी अहिल्यानगर प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत याशिवाय साहित्य कस्तुरी या डिजीटल आवृत्तीचे मुख्य संपादक आहेत. त्यांना विविध संस्था व संघटना यांचेमार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. साहित्य क्षेत्रात साहेब या टोपणनावाने काव्यलेखन करणारे श...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्थापित प्रभू श्रीराम मंदिर येथे फुटलेल्या पत्रातून पाण्याची गळती.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. पंढरपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती झाली असल्याचे दिसून येते.पंढरपूर येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यावेळी येथील मंदिराच्या व्हरांड्यात पाणीच पाणी जमा झाले होते.आमचे मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके यांनी यावेळी मंदिरात दर्शनासाठी गेले असता व्हरांड्यात पाणीच पाणी आढळून आले.येथील पत्र्यांना ठिक ठिकाणी छिद्रे पाडली आहे, त्या मधून मंदिराच्या व्हरांड्यात पाणी पडत असते, येणाऱ्या आषाढी वारी पूर्वी व पावसाळा सुरू होण्यापूर्वी छिद्राची दुरुस्ती करावी.

मूळव्याध भगंदर होण्याचे लक्षणे !

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आजारांची सुरवात आपल्याला ओळखता आली पाहिजे . बरेचदा अस होत की आपल्याला आजाराची ओळख नसते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करून आजार तसाच वाढू देतो. ज्या मुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते . सुरवातीला आपण आजार ओळखून त्याची चिकित्सा केली तर तो भविष्यामध्ये आपल्याला त्रास देणार नाही याची मात्र खात्री आहे .  सदर लेखात आपण बघणार आहो की कोण कोणते लक्षण आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या आजारानंमध्ये मुळात याचे भरपूर प्रकार आहेत. परंतु जास्त प्रमाणात आपल्याला तीन प्रकार जास्त बघायला मिळतात. एक म्हणजे फिशर यालाच संस्कृत भाषेत परिकर्तिका असे म्हणतात . यामध्ये मल (गुदमार्ग)मार्गावर चीर पडल्या जाते ज्या मुळे मलविसर्जन च्या वेळी जळजळ होणे ,रक्तस्त्राव होणे ,मल ला लागून रक्त येणे असे काही लक्षण दिसून येतात . याचे मुख्य कारण मलअवरोध व बध्दकोष्ठ  आहे . मल थांबून ठेवणे किंवा पोट साफ न होणे यामुळे हे वाढत जाते . दुसरा म्हणजे मूळव्याध ज्यामध्ये मल मार्गावर आपल्याला मासाची गाठी बाहेर आल्यासारखे वाटते . मल विसर्जन च्या वेळी स्पर्श जाणवतो .जास्त मोठे असल्यास रक्तस्त...

पंढरपूर बस स्थानकात बेवारसांचे साम्राज्य.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम  पंढरपूर बस स्थानकात सध्या गर्दीच्या हंगामात रात्र दिवस बेवारसांचे साम्राज्य पसरले असल्याचे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांच्या निदर्शनास आले आहे.भिकारी, गर्दुल्ले, दारुडे आणि बेवारस लोकांनी बस स्थानकातील प्रवाशांना बसण्याच्या बाकावर ऐसपैस झोपलेले दिसतात, पाणी किंवा इतर पेय पिऊन तेथेच पिचकारी मारतात, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करणारे सुध्दा डोक्याखाली प्लास्टिक गुंडाळून झोपलेले असतात,बस स्थानकात उभे असलेल्या पुरुष महिला व बाल वृध्दांना बाकावर बसून देत नाहीत,या प्रकरणाकडे महामंडळाचे प्रशासन लक्ष देत नाही.सध्या उन्हाळ्याचे दिवस, शाळेचे सुट्टी चे दिवस, अनेक लहान मोठ्या यात्रा या मुळे पंढरपूर बस स्थानकात रात्र दिवस प्रवाशांची गर्दी असते.भिकारी पिण्याच्या पाण्याचा वापर अंग धुण्यासाठी करतात, प्रवाशी बसण्याच्या बाकावर आणि बाकाखाली कुत्री बसलेली झोपलेली आढळून येतात.तसेच या ठिकाणी साफसफाई करणारे महिला कामगाराचा मोठा ताफा दिसून येतो तरीही स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असतात.एकंदरीत येथील स्थानिक महामंडळ प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष क...

*ग्रामीण भागातून कु.अस्मिता काळे प्रथम*

जि. प. प्राथमीक शाळा आसेगाव. येथील विद्यार्थिनी, कु. अस्मिता रामप्रसाद काळे. या विद्यार्थिनींनी इयत्ता दहावी या परीक्षेत.95.20% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून तिचं भरभरून कौतुक होत आहे. तसेच या तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

*“विनायकनामा व कुसुम” पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला — माणुसकीचा सुगंध लाभलेला आगळा सोहळा!*

डोंबिवली(प्रतिनिधी) – लेखक रमेश मारुती पाटील यांच्या “विनायकनामा” आणि लेखक रफिक इनामदार यांच्या “कुसुम” या दोन भावस्पर्शी साहित्यकृतींचा संयुक्त प्रकाशन सोहळा अलीकडे अत्यंत आत्मीय आणि माणुसकीच्या ऊबेत पार पडला. या सोहळ्याने केवळ पुस्तकं प्रकाशित केली नाहीत, तर नात्यांचा एक नवा अध्याय लिहिला. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सौ. सोनाली महेश फडके व श्री. महेश फडके होते. त्यांच्या संयोजनात पार पडलेला हा सोहळा म्हणजे घरगुती प्रेमाचा आणि साहित्यिक सौंदर्याचा संगम ठरला. अध्यक्षस्थान भूषविलेले आदरणीय 'नमाई' सुभाष नाईक यांनी आपल्या समर्पक भाषणातून “विनायकनामा”च्या सामाजिक आणि भावनिक पैलूंना उलगडलं. प्रमुख अतिथी प्रा. नरेंद्र मोहन कदम यांनी “लेखन म्हणजे आत्मशोध” हे प्रतिपादन करत लेखकाच्या अंतरंगाचा वेध घेतला. विशेष अतिथी म्हणून श्री. उत्तमराव दासू तरकसे (क्राईम ब्रांच, नवी मुंबई) आणि मातृतीर्थ सिंदखेडराजाचे १४वे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधवराव यांची उपस्थिती हा सोहळा अधिक समृद्ध करणारा ठरला. त्यांच्या विचारांनी आणि साधेपणाने सर्वांची मने जिंकली. कविसंमेलनातील कविंची हज...

*आधुनिक भारताचे जनकः लोकराजा राजर्षि शाहु महाराज*

==================== *१९ व्या शतकात आधुनिक भारताची जडणघडण करण्यात राजर्षि शाहु महाराजांचा खुप मोठा वाटा आहे. म्हणुनच ते आधुनिक भारताचे व लोकशाहीचे जनक ठरतात.*          *कोल्हापुर संस्थानात वारस नसल्यामुळे कागलच्या घाडगे घराण्यातील यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेण्यात आला.हाच यशवंत पुढे राजर्षि शाहु महाराज झाले.त्यांची कारर्किद बहुजनांच्या लोककल्याणासाठी गेली.बहुजनांच्या झोपडीत विकासाचा प्रकाश गेला पाहिजे यासाठी हा ज्ञानभास्कर आपलं आयुष्य समर्पित करता झाला.*                   *आज  सन २००० साली केंद्रशासनाने सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा केला तो शंभर वर्षापुर्वी कोल्हापुर संस्थानात शाहु राजांनी लागु केला होता.बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत,शाळेत टिकली पाहिजेत,आणि ते मोठी झाली पाहिजेत हे स्वप्नं शाहुनी साकार केलं.जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना १ रुपया दंड लावला.बहुजनांच्या मुलांसाठी शाळा काढल्या,वस्तीगृहे बांधली.तेली,तांबोळी,मराठा,माळी,धनगर,सनगर,लिंगायत,जैन,सुतार अशी वस्तीगृह काढू...

वारसा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्यिक रज्जाक शेख

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- वारसा साहित्य मंच मराठवाडा आयोजित 25 मे ला होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद येथील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी साहित्यीक रज्जाक शेख श्रीरामपूरकर यांची  बहुमताने निवड करण्यात आली.स्वागताध्यक्षपदाचे निवडपत्र उद्घाटक साहित्यिक भारत सातपुते(लातूर),वैभव धर्माधिकारी(पुणे),अर्जुन गायकवाड( बीड),नवनाथ शिंदे(अहील्यानगर),पवन शेळके, ज्ञानदेव दिघुळे आणि इतर सर्व कोअर कमिटी यांच्या हस्ते हॉटेल शांतीकमल शिर्डी येथे देण्यात आले. राज्यस्तरीय कविसंमेलनात नामांकित कविकवयित्री यांची हजेरी लागणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील  ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख  यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या दीड हजारापेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.  मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टाक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आखिल भारतीय मराठी...

*चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

दिनांक २७ एप्रिल रोजी हॉटेल ईशा येथे चंद्रकिरण काव्य मंडळाचा ३१ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संस्थापक पं. सुरेश साखवळकर  होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. सौ . विजया शुक्ला यांनी  मधुर आवाजात ईशस्तवन म्हटले. चंद्रकिरणच्या अध्यक्षा सौ. संगीता पवार यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार श्री. सतीश साठे यांनी पं. सुरेश साखवळकर यांचा परिचय करून दिला, तर गझलकारा नंदिनी काळे यांनी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांची ओळख करून दिली. सौ. संगीता पवार यांनी कार्यक्रमाचे  अध्यक्ष पं. सुरेश  साखावळकर आणि प्रमुख पाहुण्या डॉ स्नेहल कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. चंद्रकिरणच्या कवी व गझलकारा अर्चना मुरुगकर, नंदिनी काळे आणि श्रीराम घडे यांच्या काव्यार्चना, काहूर अंतरीचे व रूमणं या काव्य व गझलसंग्रह ...

महापुरुषांच्या विचाराची काव्यात्मक अक्षर पेरणी बहरली

पुणे: प्रतिनिधी        महापुरुषांच्या  विचाराचा वारसा  व विचार समाजामध्ये रुजावीत व   ते विचार अंगीकृत करावे यासाठी साहित्यिक कविता द्वारे विचारातून  समाज परीवर्तन करत आहेत.   असे मत ॲड.शरद दरेकर यांनी प्रस्ताविकेत मांडले. साहित्य सम्राटचे २०४ वे कवीसंमेलन व वारसा विचारांचा ग्रुप शिक्रापूर  यांचे संयुक्त विद्यमानाने सोनल कॅफे 1906 पाबळ रोड शिक्रापूर येथे आयोजित केले होते. कवी संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते  छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलाने करण्यात आली. वारसा महापुरुषांच्या विचारांचा या विषयासह वास्तववादी आणि मनाला भावणाऱ्या कविता व गझल मान्यवर कवींनी सादर करून उपस्थित काव्य रसिकांची मने जिंकली.    शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे  आदरणीय विनोद अष्टुळ यांची प्रबोधनात्मक भाष्य करणारी स्वराज्य ही सुप्रसिद्ध गेय कविता, युवा कवी सागर जाधव यांचे प्रेमगीत, रफिक इनामदार यांची तुपातली पोळी, सूर्यकांत नामूगडे यांची वय झालं म्हणून काय झालं, तसेच...

*कवितेच्या पारावर प्रस्तुत "कवितेचं गोत्र हरवलंय" मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात संपन्न*

            महाराष्ट्राच्या विविध भागांतील नवोदित कवी कवयित्रींना एक उत्कृष्ट प्रायोगिक मंच मिळवून देण्याच्या उद्देशाने कवी अनुकूल माळी यांच्या संकल्पनेतून, कवी प्रदीप बडदे यांच्या मार्मिक नियोजनतून तसेच कवयित्री कल्पना देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली कवितेचा पार उभारला गेला. दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सेंट्रल पार्क, घणसोली, नवी मुंबई येथे "कवितेच्या पारावर" या नव्या कोऱ्या मैफिलीचा तिसरा प्रयोग उत्साहात पार पडला.             हरवलेल्या रसिकांचा शोध घेत मनाला मनापासून साद घालत ठाणे, दिवा, कल्याण, कोपरखैरणे, पनवेल, सानपाडा, नेरूळ, वाशी, घणसोली अशा नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांनी आपली प्रार्थनीय उपस्थिती दर्शविली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व ताराराणी भोसले यांच्या खंबीर लढ्याचा ठाव घेत गीतं आणि कविता वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या गेल्या. पारावर जमलेल्या प्रत्येक कवीने स्वर व शब्दांच्या साथीने आपल्या कवितेत प्राण ओतला व रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सामाजभान, वास्तवभान त्याबरोबरच बोलगाणी, गी...

*नवनगर शिक्षण मंडळाचे,सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी ,पुणे ३५,शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल.*

.           चि.ऋषिकेश घोलप,इयत्ता ५ वी. *निगडी*:- आज,शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी २०२४-२५ मधील  इयत्ता ५ वी व ८ वी या वर्गांच्या शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झाला.इयत्ता ५ वी चे २७ विद्यार्थी बसलेले होते त्यात ७ विद्यार्थी पात्र झालेत.त्यातील ३ विद्यार्थ्यांना २०० चे पुढे गुण मिळाले.१) कु.झीनत मुलानी:- २१० गुण,२) चि.ऋषिकेश घोलप:- २०८ गुण,३) कु.ललिता चौधरी:-२०४ गुण.या विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन सौ.कल्पना उभे मॅडम,गणिताचे अध्यापन सौ.सविता पाटील मॅडम व सौ.रेश्मा बनसोडे मॅडम,इंग्रजीचे अध्यापन सौ.प्रतिमा काळे मॅडम,बुद्धिमत्ता चे अध्यापन श्री.काळूराम पवार सर व श्री.राहुल वांगेकर सर यांनी केले.यातील १)चि.ऋषिकेश घोलप व २) कु. झीनत मुलानी या दोन विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात ५० पैकी ५० तर कु.श्रेया साठे या विद्यार्थिनीला ५० पैकी ४६ गुण मिळाले. इयत्ता ५ वी चा शिष्यवृत्तीचा २५.९३% निकाल लागला.         इयत्ता ८ वी चे ३९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले होते त्यातील १२ विद्यार्थी पात्र आहेत.तर १)कु.वैभवी शिं...

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गुणवत्ता वाढते- उपप्रादेशिक अधिकारी सोनवणे

वार्ताहर (श्रीरामपुर)::   जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी शाळेत नुकताच विद्यार्थ्यांचा  गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला . चालू शैक्षणिक  वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धामधील यशाबद्दल विद्यार्थ्यांचा शाळेत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीरामपूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी राणी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना घ्यावयाची काळजी  याबद्दलचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावतो असे त्यांनी गौरवोद्गार काढले. शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संस्कार स्पर्धापरीक्षा मुंबई तसेच साई कलाविष्कार संस्था पुणे यांच्या चित्ररंगभरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,मेडल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता य...

विचार हवा व्हायला

             आज जिकडे तिकडे स्पर्धा चालू आहे असे जाणवते म्हणजे १०१% ती चालूच आहे.पण,एकमेकांशी स्पर्धा करून काय साध्य करणार आहोत आपण?तोडा, फोडा आणि राज्य करा,अशी सगळीकडे परिस्थिती झालेली आहे.जी अवनिती/कुनिती इंग्रजांनी वापरली राज्य करण्यासाठी तीच अवनिती/ कूनिती आपण वापरतो,या जीवन वाटचाली का? आणि कशासाठी? हा ही मोठा यक्ष प्रश्न आहे?हे चित्र लवकरच बदलले पाहिजे.या पुढील चित्र तर फारच भयाण असणार आहे,तेव्हा यावर आताच विचार व्हायला हवा आणि त्यातून उपाय योजना ही.हे साहित्याच्या नावाखाली चालणारे बाजार थांबविले पाहिजे.आपल्या आपल्यात वाद लावून द्यायचे आणि त्यांनी स्वतःचा फायदा  करून घ्यायचा.दोन मांजरी आणि एका माकडाची गोष्ट ही आपणा सर्वांना परिचित आहेच.तीच अवस्था आपली आपणच करून घेतली आहे.         आपण स्वतःस साहित्यिक म्हणवितो आणि आपणच एकमेकांना किंमत,मान सन्मान देत नसेल तर काय उपयोग? कोणत्या तोंडाने स्वतःस साहित्यिक म्हणवून घेतो?आपल्या लेखणीचा आणि माणूस या पात्राशी काही संबंध उरतो का?एकीकडे मोठ्या रुबाबात म्हणायचे आम्ही व्यवसाय...

*नीलपुष्प काव्यसंध्या आणि गझल कार्यशाळा एक आनंददायी सोहळा*

........................................ ठाणे: रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५ एकीकडे आज रामनवमीचा उत्सव सुरू असतानाच नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे आणि वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या आनंद विश्व गुरुकुल प्रांगणात सांगलीचे सुप्रसिद्ध गझलकार सिराजभाई शिकलगार यांची गझल मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.  सुरुवातीलाच पाहुण्याच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. आणि निवेदिका निलम शेलटे यांनी सुप्रसिद्ध गझलकार सिराजभाई शिकलगार यांचा सुंदर असा परिचय करून दिला.  त्यानंतर राजेश साबळे ओतूरकर अध्यक्ष नीलपुष्प आणि प्रा. नागेश हुलवळे संस्थापक वर्ल्ड व्हिजन यांनी दोन्ही संस्था तसेच सौ सावित्री ताई झांबरे आणि तानाजीराव झांबरे यांच्या तर्फे सिराज शिकलगार सरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यानंतर गझलकार सिराजभाई यांनी आपल्या ओघवत्या भाषेत अतिशय छान असा काव्य, कथा, लेख, साहित्य आणि गझल या एकाच आहेत. त्यात कोणीही डावे उजवे करू नये. असे आणि समजण्याचे कारण नाही. कारण चांगले काव्य करता आले तरच चांगली गझल लिहिली जाते.  गझल हा कवितेचच प्रकार आहे. कोणी ही गझ...

खाजगी रुग्णालयावर व औषधांच्या कंपन्या वर शासनाचे नियंत्रण असायला हवे.. साहित्यिक भारत कवितके यांचे मत.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम. महाराष्ट्र राज्यातील खाजगी रुग्णालयावर व औषधांच्या कंपन्या वर शासनाचे नियंत्रण असायला हवे, असे मत मुंबई कांदिवली येथील साहित्यिक भारत कवितके यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.भारत कवितके पुढे म्हणाले," नुकतीच पुणे येथील मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या असंवेदनशील घटनेने एका महिलेला दोन मुलींना अनाथ करून जीव गमवावा लागला,पुरा महाराष्ट्र हळहळला, डॉक्टरांनी आपला पेशा धर्म समजून करावा, डॉक्टर होण्यासाठी शैक्षणिक बाबतीत खूप आर्थिक बोजा सहन करुन डॉक्टर होतात,हे जरी मान्य असेल तरी डॉक्टरांनी रुग्णांचे आर्थिक शोषण करु नये असे प्रामाणिकपणे वाटते, काही काही वेळा रुग्णांना दाखल केल्यानंतर दोन तीन दिवसांनी डिस्चार्ज देताना जे बील होते ते पाहून रुग्णांचा व नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकतो, आयुष्य भराची जमा केलेली पुंजी एका झटक्यात संपून जाते.भविष्याची चिंता सतावत राहते, प्रत्येक खाजगी रुग्णालयात आर्थिक बाबींचा नोटीस फलकावर लावण्यात यावा, रुग्णालयीन वस्तूंच्या किंमतीची नोंद करण्यात यावी.उदा.बेड चार्ज, तपासणी फी,एक्सरे फी, रक्त तपासणी फी, सीटी स्कॅन, औषध ग...

*प्रत्येक विभागीय महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवनाची निर्मिती*

नवी मुंबई प्रतिनिधी:- सुचित्रा कुंचमवार ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था ही संस्था अखिल भारतीय जेष्ठ नागरिक कॉन्फरन्स व महाराष्ट्र  ज्येष्ठ नागरिक फेडरेशन व नेरूळ ज्येष्ठ नागरिक संस्था या संस्थांची शिखर संघटना आहे. या संस्थेची बैठक दिनांक 29/3/2025 रोजी संपन्न झाली. या बैठकीत सन 2025 - 26 या वर्षातील उद्दिष्टांवर चर्चा करतांना संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एन. चापके यांनी विभागीय मुख्यालयाच्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवनाची निर्मिती करण्यात यावी असे  आवाहन केले. यासाठी त्या  क्षेत्रातील  सर्व ज्येष्ठ नागरिक संघानी, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींकडून सहकार्य घ्यावे तसेच सी.एस.आर.व दानशूरांकडून  देणगीव्दारे हा प्रकल्प साकार करावा असे मत मांडले .असे प्रकल्प साकार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था उचित मार्गदर्शन करेल असेही आश्वासन दिले. या बैठकीला श्री.पांडुरंग क्षेत्रमाडे खजिनदार, श्री. प्रभाकर गुमास्ते सहसचिव , डॉ. अण्णासाहेब टेकाळे सदस्य, श्री. अरविंद वाळवेकर, सदस्य, श्री अंकुश जांभळे सदस्य, श्री. चंद्रकांत महामुन...

पुस्तक समीक्षणपुस्तकाचे नाव:- मी अहिल्या आहे(ऐतिहासिक कादंबरी)लेखिका:- रंजना फतेपुरकर( मै अहिल्या हूं)अनुवादक:- डॉ.एन.जी.काळे( हिंदी भाषेतून मराठीत अनुवाद)प्रकाशक:- श्री.सर्वोत्तम प्रकाशन,इंदोरमूल्य::-२०० रुपये एकूण पृष्ठ:- १०४समीक्षक:- सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण,पुणे ४४

पुस्तक समीक्षण पुस्तकाचे नाव:- मी अहिल्या आहे (ऐतिहासिक कादंबरी) लेखिका:- रंजना फतेपुरकर( मै अहिल्या हूं) अनुवादक:- डॉ.एन.जी.काळे( हिंदी भाषेतून मराठीत अनुवाद) प्रकाशक:- श्री.सर्वोत्तम प्रकाशन,इंदोर मूल्य::-२०० रुपये  एकूण पृष्ठ:- १०४ समीक्षक:- सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण,पुणे ४४ पुस्तक म्हणजे आत्मा असतो.त्यात ऐतिहासिक कादंबरी जीव की प्राण.त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित रंजना फतेपुरकर मॅडम यांनी लिहिलेली ही कादंबरी मूळ हिंदी भाषेतील आहे,मैं अहिल्या हूं.त्याचे अनुवादक डॉ.एन.जी.काळे सर आहेत.         या पुस्तकाला श्रीमंत यशवंतराव होळकर सर,डॉ.सुधीर तांबे सर,घनश्याम होळकर सरांच्या ही शुभेच्छा लाभलेल्या आहेत.तसेच या पुस्तकाची डॉ.देवेंद्र जोशी सरांनी समीक्षा केलेली आहे.रंजना मॅडम यांचे सुंदर असे मनोगत अन् आभार.तसेच रंजना मॅडम यांनी हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी अर्पण केलेले आहे.           पुस्तकाची भाषा ओघवती आहे.सर्व सामान्य व्यक्तींना ही भाषा समजेल त्यामु...